शुक्रवार, २५ मार्च, २०१६

सल सलते मनात

सल सलते मनात
रणरणत्या उन्हात
पाऊले वळतात
दुःखी भूतकाळात

नको त्या आठवणी
रूक्ष भेटीच्या ठिकाणी
कृश मने केविलवाणी
क्रंदती विरह गाणी

उज्वल भविष्यात
आंतरिक होरपळतात
एकमेव निरव एकांतात
षष्प संवाद साधतात

भरकटलेल्या स्वप्नांची
गर्भगळीत मनांची
सांगड एकोप्याची
होळी भावविश्वाची

क्रमिक घटना
बुजलेल्या वेदना
परतीचा पाहुणा
भ्रमाच्या धारणा

मागमूस जगण्याची
वर्दळीत जाणीवांची
एक तिरीप प्रकाशाची
मांदियाळी दिवास्वप्नांची

भूषण वर्धेकर
28-09-2015
हडपसर
रात्रौ 9:55

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

समाज आणि क्रांती

  जर एखाद्या माणसाला शैक्षणिक आणि सरकारी कसल्याही सोयीसुविधा सवलती मिळाल्या नाही तरी त्याने निम्नमध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्...