विडंबन कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विडंबन कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ मार्च, २०२५

विडंबन

विडंबन

कुणी ट्रम्प घ्या, कुणी झेलिन्स्की घ्या 
या रे पत्रकारांनो, या रे या
आंतरराष्ट्रीय हा आनंद घ्या
वाढीव बाचाबाचीचा बाईट घ्या 

युद्धात फवारतो छुप्या कंड्या, ऑन कॅमेरा बरळतो रे
विश्वाचे भाग्य उद्याचे बोलून नासवतो
शांतता वाद्यांना फाट्यावर मारुन रे हा इव्हेंट करतो
बडबडीचा लाईव्ह कास्ट घ्या 
उन्मादाचा दृष्टांत घ्या 

चार खंडांचे वैश्विक आत्ममग्न नेते सिंहासनी
खाणं कामांचे टेंडर हे डुलत्या महाशक्ती पदी
बरळा बोंबला ट्रम्प च्या नावाने ठोठो करूनी
युद्धाचा तडका बघा
शांततेचा हा फार्स बघा

 
©भूषण वर्धेकर 
२ मार्च २०२५
पुणे 

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

पुरस्कार

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी)

एक पुरस्कार द्या मज आणुनि
मिरवीन मी जो मुक्तकंठाने
भडकूनी टाकिन सगळी माध्यमे
प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने
असा पुरस्कार द्या मजलागुनी

शासनाच्या परीटघडीचे
व्यवहार असे जे आजवरी
होतील ते मला सत्वरी
भाषणे देता त्या समयी
कोण पुरस्कार तो मज देईल?

इकोसिस्टिम त्यांची खंबीर
प्रशासन आंदण तुम्हाला
हळूच ढापती लीलया
महामेळावा जनसागराला
पुरस्काराचे समालोचन हवे तर?

सत्कार! ते बक्षिसे घेऊनी
सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे
अलिकडले टीकाकार ते
ओरडती धरुनी आपटूनी बोटे
चित्कार करुद्या सर्वांना

निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती
फेकुनी किंवा दुर्लक्ष करा
न कळता प्रतिमा उंचवा
हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार
कंपूत चला डोकं बुडवूनी

सांप्रत काळ हा मिरवण्याचा
सोशल मेडिया आहे साथीला
गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा
बसल्या जागी व्हायरल करा
दिखाऊ पणा करु चला तर!

लाळ घुटमळूनी सैल संचार
गावोगावी हिंडून मैलभर
गत इतिहासाची मढी उकरुन
रक्तरंजित वसा उगाळून
पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ

जातपातधर्माचे भांडणं लावून
जनसेवेला आणिती अडथळे
एकामागोमाग सैरभैर मुद्दे
अनैतिकता पदसिद्ध भले
पुरस्कारार्थी होतसे इथे

©भूषण वर्धेकर
१९ एप्रिल २०२३

स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन

  स्वतंत्र भारताचे सहस्त्रचंद्रदर्शन गेल्या आठ दशकांपासून भारतात कैक घडामोडी घडल्या ज्यातून भारतीय जनमानसाची सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्...