पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी एक एकटा भरकटलेला

मी एक एकटा भरकटलेला एकांतवासात गुदमरलेला झगमगत्या उंच मनोऱ्यात बंदीवासात तरफडलेला भौतिक सुखांसाठी हपापलेला ऐशोआराम टिचभर पोटाला लखलखत्या चंदेरी स्वप्नात जुंपलो बैलांच्या घाण्याला कस्पटासमान मानून नैतिकतेला बुद्धीसकट विकले स्वतःला मस्तवाल कलाकारांच्या दुनियेत तोचतोचपणा मेटाकुटीला सुखवस्तु लोकांच्या मनोरंजनाला विस्कटलेल्या कलेचा हवाला जीर्ण संवेदनेच्या चित्रनगरीत उच्च भाव इथे कुटुंबकल्लोळाला गिचमीड लेखण्या निर्ढावलेल्या गृहीत धरुन सर्जनशिलतेला मध्यमवर्गीय किर्द पठडीत ठोकताळे घरगुती चौकटीला वाहिन्यांनी बाजार मांडला उथळ विषयांचा बोलबाला क्षीण कथासूत्रात खितपत फाट्यावर मारून प्रगल्भतेला शून्य मानधन वैचारिकतेला निर्मितीमुल्ये उंची दिखाव्याला नवनिर्मिती काढून मोडीत नॉस्टॅल्जिक चिखलात माखलेला ----------------------------------------- भूषण वर्धेकर, १० नोव्हेंबर २०१७ रात्रौ ११:२५ हैद्राबाद -----------------------------------------

हा आसमंत माझा

हा आसमंत माझा मी अनन्यसाधारण त्यापुढे उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर गजबजलेल्या तिन्ही दिशा माझ्या पाठी नजर मात्र रोखून उर्वरीत दिशेला गरजत आलो मी जिंकून नैराश्य अनंत अवकाशात मी फैलावून बाहू गतकाळच्या चुका चूलीत घालून नवनिर्माणाच्या हाकेला सकारात्मक हुंकार किर्र अंधारातली तिरिप हाताशी उजळून टाकाया आयुष्य सुंदर मी तयार आहे… या दुःखांनो झेलायला अणूकुचीदार शस्त्रे निधड्या छातीने सामोरे जाऊन खंबीरतेने मागे न रत्तीभर हटता ऊठा.. ऊठा.. भूमीपुत्रांनो वैरी आपल्याच मानगुटीवर खेचा खाली त्याला तुडवा पायदळी.. फडकवा लक्तरे त्याची म्यान झालेल्या तलवारी पुन्हा उसळू द्या भेदून टाका त्या जखमा विव्हळणाऱ्या.. कुरवळणाऱ्या धुंदीत गुलछबू मनाच्या चिरफाड करा तुमच्या नतद्रष्ट संकुचित विचारांची येऊद्यात फुत्कार मानव्याचे ससेहोलपटत असणाऱ्या शूद्र मनाला पोकळ विचारसरणीचा आधार द्या झुगारून अखंड वरात तुम्हाला मागे खेचणाऱ्यांची घ्या हाती शस्त्रास्त्रे बिमोड करायला कमकुवत स्वप्ने अन् मुडदूस ध्येयाची करा राखरांगोळी….. एक व्हा… सज्ज व्हा.

येथे मृत्यूचाही बाजार होतो

येथे मृत्यूचाही बाजार होतो सोबत उथळ विचारांचा बागुलबुवा मेलेल्यांचा जात, धर्म पाहून होतो निषेध विचारसरणीच्या सरणावरती असतो इव्हेंट मानवतेच्या उदरात उजवे डावे वेगळे होतात उथळ विचारांच्या कोशात विचारजंत एक होतात आमचा मेला तर असहिष्णुता तुमचा मेला तर पूर्वाश्रमीचे पाप अशाच कमकुवत बौद्धिक चर्चा जोरजोरात उकरुन काढतात जूने संदर्भ आपल्याच विचारसरणीचे राखून अबाधित हक्क काढले जातात जात-पात अन् धर्माचे वाभाडे विखुरलेले वैचारिक नागडेपणाचे आखाडे आहेत नंतर मोर्चे, शोकसभा अन् आणाभाका शिणलेल्या क्रांतीचा निपचित फौजफाटा आरोप प्रत्यारोप संकुचित बुद्धिमत्तेचा उरुस सळसळतात लेखण्या, कुंचले वृत्तपत्रातून सोयीनुसार संदर्भ, नोंदी पानापानांतून कोणाची मुस्कटदाबी, कोणाचा बुलंद आवाज जो तो आपआपल्या विचारांचा घेऊन झेंडा थोटक्या बुद्धिमत्तेचा विस्कटलेला गावगाडा गंजलेली निषेधाची हत्यारे, बुरसटलेली भाषणे, रुतलेली दांभिकता, विद्वत्तेचा गजकर्ण, ढोंगी विचारस्वातंत्र्याची दिवाळखोरी, विस्कटलेल्या मानवतेची मक्तेदारी दुभंगलेली देशाची दुनियादारी --------------------------- भूषण वर्धेकर ७ सप्टेंबर २०

आयुष्याच्या उधळलेल्या

आयुष्याच्या उधळलेल्या आकांक्षा आक्रोशातल्या होरपळलेल्या भावना भावबंधाचे निसटलेले किनारे करूणेचे ढासळलेले मनोरे गाभाडलेल्या ईच्छा अन् मनोकामना निखाऱ्यात विसावल्या संवेदना मर्दुमकीचे फोडलेले अचाट टाहो चिरकाल धुमसत स्मरणात राहो एकांतातले निपचित विचारचक्र गर्द आठवणीत पाणावलेले नेत्र कस्पटासमान रूतलेले आस्तित्व विरहातलं एकलकोंड ममत्व पुसलेल्या पाऊलखुणांच्या वाटा अनाकलनीय गूढ जगरहाटा हुंदक्यामधली सूक्ष्म स्पंदने कर्दमलेली आभासी मने घुसमटीची कर्णकर्कश्य ललकार स्वप्नांतल्या दुनियेची तीक्ष्ण चिरफाड काळोखाच्या अतर्क्य उलाढाली मेटाकुटीचे जगणे नियतीच्या  हवाली --------------------------- -- भूषण वर्धेकर  हडपसर, पुणे रात्रौ ११:०० १७ एप्रिल २०१७ -----------------------------