पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवा तुझी कमाल आहे

देवा तुझी कमाल आहे भक्तांचीपण धमाल आहे राजरोस उपास आहेत उपासनेचा वाणवा आहे प्रत्येक वार ज्याचा-त्याचा उर्वरीत खेळखंडोबा उत्साही लोकांचा महापूर चंगळवाद भौतिकवादी खाबुगिरीसाठी धर्मदाय संस्था सोन्या चांदीचा ढीग पैशांचा जोर दररोज तोंडदेखलेपणा समाजसेवांचा भक्तीचा अलौकिक गजर कार्यकर्त्यांच्या ताफ्यात DJ वगैरे फ्लेक्स मात्र डोंगराएवढे कर्तृत्वाची बंद कवाडे ज्याचा-त्याचा धर्म, पंथ ज्याचा-त्याचा महापुरुष जयंत्या पुण्यतिथ्या आधी व नंतर साप्ताहिक सोहळे सुरुच गर्दी खेचण्याची स्पर्धा रेलचेल करमणूकप्रधान कार्यक्रमांची विचारवंतांचा वाणवा बजेट सँक्शन करणाऱ्यांचा जलसा. . मिरवणुका. . सत्कार. . गल्लोगल्ली हीच बोंब तरूण म्हातारे सगळे एकछत्राखाली महिलांसाठी आघाड्या स्त्री सुरक्षा रामभरोसे जगात आपणच भारी आपला महोत्सव भारी यांतच युवा नेते  जुंपले विचार आचार  आशय वगैरे गतकाळापुरते राहिले आता केवळ संख्यात्मक पाठबळ टक्केवारी निरंतर जात पात कागदोपत्री लिफाफे लालफिती धुळखात धांगाड-धिंगाचा कळस हिशेबाचा ना ताळमेळ खर्च बिनभोबाट नंतर आहेच खंडणी वर्गणी वगैरे कहर झालाय समाजात

पत्र क्रमांक नऊ

आज मी असे लिहितोय या मागे केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे माझ्या मनातील वेदना मोकळ्या होणे. तसेही ह्या बाबतीत कोणाशीच बोलू शकत नाही. गेले १५ दिवस मला कळत नाही कसली तरी अनामिक ओढ तुझ्याकडे खेचतेय. मी याला प्रेम म्हणून शकत नाही कारण ते दोन्ही बाजूने असेल तरच घडते. एरवी क्रश किंवा एकतर्फी गुंतणे असावे असे वाटते. मला नक्की आठवतेय गेले वर्षेभर मी कधीच तुला पाहून अशा पद्धतीने व्यक्त होत नसे. कारण तेव्हा तुझ्याकडे पाहून मला कसलीच हूर हूर वाटत नव्हती. मात्र जसे मी IPL सामना पाहून आलो आणि त्या नंतर एकूण माझ्या जगण्यात प्रवाहाचे वारे वेगळेच वाहू लागले. म्हणजे अगदी गेल्या १५ दिवसात  एकाएकी तुझ्याकडे आकर्षिले गेलोय. एरवी तू फोनवर कोणाशी बोललीस, ऑफिसमध्ये कोणासोबत बोललीस, अगदी मित्रत्वाच्या नात्याने तरी मला काहीच वाटत नसे. मात्र गेले १५ दिवस तुला पहिले की फारच हूर हुर ,धडधड आणि हात पाय कंप पावतात. तुला कोणासोबत बोलताना पाहून फार बेचैन होतोय. कदाचीत खूप खोलवर जाऊन तुझा असा लाईफ पार्टनर म्हणून मी विचार केलाय का? कळत नाही.  कारण मला अफेअर वगैरे आवडत नाहीत चिरकाल टिकणारी नाती आवडतात. आणि महत्वाचे म्हण

पत्र क्रमांक सहा

अनाहूत असे पत्र लिहितोय त्याबद्दल क्षमस्व ! सर्वप्रथम हे जाहीर करतो की, प्रस्तुत लिखाण म्हणजे रुढ अर्थाने प्रेमपत्र वा तत्सम कसलाही प्रकार अजिबात नाही. केवळ माझ्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन द्यावी या साठी केला गेलेला हा पामर प्रयत्न आहे. एक महत्वाची बाब मला विशद करावीशी वाटते की मी हे असे पराक्रमी लिहून तुझे मन वळविण्याचा  किंवा माझ्याबद्दल विचार करण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत नाही.. वा तसा तुला विचार करायची गरजच नाही. तू तेवढी करारी आणि बाणेदार आहेस.. ( अरे हो की हाही गुण मला तुझा भावला होता!) तुला माझ्या केवळ शुद्ध भावना कळाव्यात हाच एकमेव हेतू ह्या लेखणात आहे... आजवर जे काही दोन आठवड्यात घडले वा नकळतपणे घडवले गेले ते विलक्षण होते. एकूणच माझ्या हातून जे घडले ते कसे वा का घडले? ते अजून मला उमगत नाही. आजवर असे भावनाविवश वगैरे होणे मला पहिल्यांदाच  भावतेय. कारण मी स्वतंत्र विचार करणारा समाजशील प्राणी आहे. माझ्या जगण्याच्या आखीव-रेखीव अशा पाच मिती आहेत. वाचन -लेखन-मनन-चिंतन-सूक्ष्म निरीक्षण. या सर्वांचे प्रवाही सिंहावलोकन म्हणजे माझे जीवन. एकूण मौज आहे बरं का? कोणी एक मुलग

पत्र क्रमांक सात

क्षमायाचना करण्याजोगे सभ्य अपुले नाते असावे त्यात मनातून खचून उतरलेल्यांना दमडीएवढे स्थान असावे मैत्रीचाहि पिंड वेगळा स्नेहसंबंधाचा धागा निराळा त्यात गुंतणारा  भावसोहळा तरी माफी मागावी आम्ही एकदा म्हणून अवतरली प्रस्तूत कविता ! ! ! कधी कधी काही कळेनास होतं. मी तुला जो मध्यंतरी त्रास दिला तो खरच “ खोटा “ म्हणून दिला की “ खरा” म्हणून दिला? असो, तो मुद्दा येथे आज मला संपवायचा आहे.जे आज मी तुला ही इमेल करतोय तीस तू ‘ लवलेटर ‘ म्हणायचे की  "दास्ताने-ए-जंग" असे म्हणायचे तूच ठरव. तसे पाहता मी एक खेडवळ भागातून आलेला मुलगा. ना माझ्यापाशी कसली कला न कसली निपुणता. ना मी अभिनय करू शकत, न मी नाच करू शकत , ना गाऊ शकत, ना कोणते वाद्य वाजावू शकत. पण सगळ्या गोष्टी करायची भारी हौस, आवड आहे, होती व असेल यात शंका नाही. कलामंडळात आलो तेव्हा फक्त एकच ध्येय होतं “ नाटक “ बाकी काही नाही. पण इथे फक्त सिनिअर्स बरोबर म्हणतील तोच कायदा? असा पाठ आहे. ते असो कलामंडळाचा विषय निघाला की नुसती वादा-वादी, चर्चा, गटबाजी, रूसवे, फूगवे हेच सर्व गिरवाव लागतं. कारण या सर्व गोष्टी मिळूनच कलामंडळ बनतं.काही गोष्टी सका