पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुंबई कुणाची?

मुंबई कुणाची गं बाई कुणाची? लढणाऱ्यांची की लुटणाऱ्यांची? मुंबई कुणाची ? बकाल झोपड्यांची की गगनचुंबी सोसायट्यांची किनाऱ्यावरच्या आगरी कोळ्यांची की शेठ लोकांची फसवलेल्या कामगारांची की धूर्त कारखानदारांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? कष्टकऱ्यांची की लुबाडणाऱ्यांची? मुंबई कुणाची ? गोरगरीब भैय्यांची की खंगलेल्या भूमिपुत्रांची अलिशान बंगल्यांची की जीर्ण झालेल्या चाळींची झगडणाऱ्या कलाकारांची की मुजोर घराण्यांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? विस्थापितांची की प्रस्थापितांची? मुंबई कुणाची ? बुजलेल्या मध्यमवर्गीयांची की फुगीर उच्चभ्रू वर्गांची बरबटलेल्या नाल्यांची की गजबजलेल्या वस्त्यांची विस्तारलेल्या पश्चिमेची की पसरलेल्या पुर्वेची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? व्हेजवाल्यांची की नॉनव्हेजवाल्यांची? मुंबई कुणाची ? गब्बर गुंतवणूकदारांची की लढवय्या संघटनांची कोंडलेल्या घरांची की गुर्फटलेल्या कुटुंबांची विदीर्ण जंगलांची की आत्ममग्न उपनगरांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? महत्वकांक्षांची की अपेक्षाभंगांची मुंबई कुणाची ? कीर्द कल्लोळ्ळाची की कोंदट वातावरणाची लब्बाड आश्वासनांची की कर्कश भूलथापांची उपऱ्या लोंढ

AI ML Data Science in Education field

A.I., M. L. And data science © Bhushan Vardhekar AI, ML, Data Science related courses are currently considered as the most appropriate job oriented courses. At present, the overall education policy is being changed at the national level and the online virtual marketplace for teaching programming, coding, etc. becoming hyper to attract parents and their children. This is definitely at a loss for school going children. What once was in the field of engineering colleges, or even worse, will be in the field of AI, ML, data science such trendy courses. Because of the way in which marketing is being done there is no option other than AI, ML, Data Science courses to get new high paying jobs. This is a kind of blind propaganda. My personal opinion is that long ago in Maharashtra MSCIT courses were conducted and failed to cope up with ongoing job demand then. Same way these AI, ML, Data Science courses will be going to decline to cope up with new trends in the upcoming job market. This is becau

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस ©भूषण वर्धेकर सध्याच्या काळात सर्वात जॉब ओरीएन्टेड कोर्सेस म्हणून एआय, एमएल, डेटा सायंस कडे पाहिले जाते. सध्या एकूण राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक पॉलिसी बदलत आहे आणि त्याच अनुषंगाने लहानमुलांना प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे शिकवण्यासाठी जी ऑनलाईन आभासी बाजारपेठ तयार होत आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच तोटा होणार आहे. जे कधीकाळी इंजिनीअरिंग क्षेत्राचे झाले होते तसेच किंवा त्याहून भयंकर एआय, एमएल, डेटा सायंस या क्षेत्राचे होईल. कारण ज्या पद्धतीने एक मार्केटिंग केले जात आहे की नव्या भरपूर पगारांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी एआय, एमएल, डेटा सायंस चे कोर्सेस केल्याशिवाय पर्याय नाही. हा एक प्रकारचा आंधळा प्रचार केला जातोय. माझे व्यक्तिगत मत असे आहे की एम. एस. सी. आय. टी. चे कधीकाळी जसे तुडुंब कोर्सेस चालत होते तसेच काहीसे या एआय, एमएल, डेटा सायंस चे होईल. कारण एआय, एमएल, डेटा सायंस समजून घेण्यासाठी जी पार्श्वभूमी असावी लागते ती बहुतेक वेळा  बघितली जात नाही. तुम्हाला कोडिंग येते का नाही येत यापेक्षा तुम्हाला काही पॉप्युलर लायब्ररीज कश्या वापरायच्या आणि कोणत्या डेटा वर कशा पद्ध

कोरोनाने काय शिकवलं?

कोरोनाने काय शिकवलं? २०२० ची सुरुवातीच्या काळात चीनच्या कोण्या एका प्रातांत वुहान नावाच्या शहरात कोव्हिड-१९ नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातलाय एवढेच वाचण्यात आले होते. तथापि त्यासाठी लॉकडाऊन वगैरे केलेल्या शहरांबद्दल तत्सम बातम्या येत होत्या. भारतात पहिला रूग्ण  सापडला तो केरळात आणि मग अवघ्या देशातील एकेका शहरात संक्रमित होण्यास कोरोनाला वेळ लागला नाही. मग अवघा भारत कोरोनामय, लॉकडाऊन सँव्ही आणि हेल्थ कॉशस वगैरे झाला. भारतातील आरोग्याच्या कोलमडून गेलेल्या व्यवस्थेची लक्तरे यानिमित्ताने मांडली गेली. मुळात कोरोनाचा प्रसार हा रोखण्यासाठी संंसर्ग होऊ नये वा कमी प्रमाणात व्हावा अशा प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक होती. काही ठिकाणी ती व्यवस्थित राबविली गेली तर काही ठिकाणी तीचे तीन तेरा झाले. संसर्ग ह्या एकमेव तात्काळ फैलावणाऱ्या गोष्टीबद्दल जी विशेष खबरदारी घ्यायला हवी होती ती न जमल्याने कोरोनाचा प्रसार बिनधोक झाला. मुळात आपल्या देशात संसर्ग हा कोणताही असो वैचारिक वा साथीच्या आजारांचा फैलावला की फैलावतोच. त्याच्यावर ताबा मिळवणे महाकठीण. कारणं अनेक आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला भलामोठा देश जो उभा

Takeaway of Covid-19 and Lockdown

Takeaway of Covid-19 and Lockdown New Year 2020 started with a lot of hopes and expectaions. Wuhan city located in China far away from us was locked down for 3 months as it has been found that the outbreak of Corona virus started from same city. No one were aware of that such small virus having size in hundreds of nanometers could shook the hundreds of crores population worldwide. Now we are in mid of 2020 and having uncertainty of overall aspects of life. Bookish positive quotes and inspirational thoughts are spreaded to gear up the morals of badly affected people in the begining. Now everyone is in the mood of bursting mode as nothing can be controlled. All govt medical infrastructres which were introduced were britishers badly impacted by outbreak of corona positive. All public admin strategies got stuck. In the realm of politics allegations and claims reached to peak of hypocrisy. The biggest pain of this covid19 was immigrant suffering. The challenges to reach their belonging vill

काश्मिरी पंडितांचे प्रश्न

पुढच्या महिन्यात विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित शिकार चित्रपट प्रदर्शित होतोय. काश्मिरी पंडितांनी ९० च्या दशकात शेवटाला जे भोगलेय त्याचं चित्रण केलेले आहे. अर्थातच बॉलिवूडपट असल्याने लव्हस्टोरी विथ मसाला मुव्ही व्हाया इमोशनल ड्रामा वगैरे असेलच. माझ्या या लिखाणाचा हेतू सिनेमविषयी नसून, काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल आहे. एकूण हिंदुत्ववादी गटाचा आवडता विषय म्हणजेच काश्मिरी पंडितांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा. ज्याच्या जोरावर धर्मीय ध्रुवीकरण हमखास केले जाते. अर्थात तत्कालीन सरकार कॉंग्रेसप्रणीत होते त्यामुळे त्यांचे हे अपयश होते आणि आहे हे मान्य करायलाच हवे. ३७० रद्दबातल केल्यामुळे जो कांगावा केला जातोय आणि ज्यांच्याकडून केला जातोय ती चतुर मंडळी काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल कधीही बोलणार नाहीत. आता तर दोन पंथ मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे हे सरसकटपणे सगळ्याच क्षेत्रात झालेत. त्यामुळे सगळीकडेच आनंदीआनंद आहे. मुळ मुद्दा हा आहे जर गुजराती दंगली, बाबरी मस्जिद पतन वगैरे वगैरे घटनांचा पाठपुरावा केला जातो, या घटनांसाठी भाजपाला किंवा एखाद्या तत्कालीन जबाबदार व्यक्तीला जसे टार्गेट केले ज