पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युद्ध नावडे सर्वांना

युद्ध नावडे सर्वांना... © भूषण वर्धेकर मे २०२१ आजकाल आंतरराष्ट्रीय युद्धाच्या घटनांचा भारतातील समाज माध्यमांवर सुळसुळाट जोरात चालू आहे. मग अशा वेळी मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या विचारवंतांच्या फॉरवर्डेड लेख, स्फुटं, ऐतिहासिक नोंदी व्हायरल होत आहेत. तशाच गोष्टी कट्ट विचारसरणीतील मंडळीपण बिनधोक पणे पसरवतात. पीडीत कोण आवडता की नावडता हाच कळीचा मुद्दा आहे जणू! अशी युद्धे, जमीन बळकावून हस्तगत करणे हे परंपरागत चालत आलेल्या ऐतिहासिक घोडचूका आहेत. आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये युद्धाचा आलेख बघितला तर पैसा, जमीन आणि सत्ता मिळवण्यासाठीच युद्धजन्य परिस्थिती तयार केली जाते. एखाद्याला गुलाम करणे ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तसेच कमी शक्तीशाली देशाला किंवा समुहाला येनकेनप्रकारेण सोयी सवलती देऊन प्रसंगी धमकीवजा इशारे देवून काबूत ठेवले जाते. विस्तारवादी धोरणात हाच दुर्गुण आहे. वॉर मिनिस्टर किंवा डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक देशात असतोच असतो. संरक्षण ही सामाजिक मुलभूत गरज आहे. मग ते संरक्षण देशाचे असो वा समुहाचे. मग अशावेळी जो आपला तारणहार असेल त्याचा उदोउदो ठरलेलाच. त्याच्या चुका, घोडचूका किंवा अनंत अपराध सगळे पो