पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठा आरक्षण आणि वास्तव

स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि १९९० नंतर खूप महत्वाची स्थित्यंतरे महाराष्ट्रात झाली. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ झाली या तीनही कालखंडात. त्याचे परिणाम समाजातील सगळ्याच जातीपातीच्या लोकांना भोगावे लागले. सध्या आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विचार करु. मराठा समाज कधीकाळी शेकडो, हजारो एकर जमीनींचा मालक होता. सरंजामशाही, संस्थानिकं, वतनदारी, जहागिरदारी इतकं सगळं या समाजाला लाभलेलं होतं. खापर पणजोबा कडे असणाऱ्या शेकडो एकर जमिनी आज खापर पणतूकडे तुकडे तुकडे करून किती एकर झाली हे बघितले तर समजेल की सर्वसामान्य मराठा समाजाला शेती मध्ये घर चालवण्यासाठी देखील उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे खाजगी नोकरीत शेतीधंदा सोडून लक्ष द्यावे लागले. पन्नास साठ वर्षांपूर्वी ज्या सर्वसामान्य मराठा समाजाकडे शेकडो एकर शेतजमिनी होत्या त्या गेल्या आणि जेमतेमच तुटपुंज्या जमीनीचे तुकडे आताच्या बहुसंख्य सर्वसामान्य मराठा कुटुंबाच्या वाट्याला आले आहेत. याच्या वर कोणीही चिकित्सा करणार नाही. कारण राजकारणात समाजाचे प्रश्न फक्त मांडून डाव खेळला जातो. त्याची कारणमीमांसा केली जात नाही. त्यावर कायमस्वर

उठ भक्ता जागा हो

उठ भक्ता जागा हो बॉयकॉट चा धागा हो संस्कृतीच्या रक्षणासाठी भावी पिढीच्या कल्याणासाठी  उठ गुलामा पेटून उठ लढण्यासाठी रणशिंग फुंक भक्तमुजोरीला मोडण्यासाठी पुरोगामित्व टिकवण्यासाठी पळ सैनिका जिवानिशी धाव उचल सतरंज्या खाऊन वडापाव आदेशाचे पालन करण्यासाठी  अस्मितेचा अंगार पेटवण्यासाठी खडबडून जागा हो नवसैनिका कर खळखट्याक घे आणाभाका  परप्रांतियांना ठोकण्यासाठी नवनिर्माण जोपासण्यासाठी  लाल कॉमरेडा ठोक सलाम रक्तरंजित संघर्ष कर बेफाम मॅनिफेस्टोच्या संवर्धनासाठी शोषितांच्या मतदानासाठी गर्जून मूलनिवासी घुमू दे नारा वंचितांचा तूच एकमेव सहारा सवर्णांना धडा शिकविण्यासाठी निळ्या क्रांतीच्या उत्थानासाठी आवळून घट्ट मनगट, हे बिग्रेड्या तोडफोड कर बनून घरगड्या सनातन्यांना संपवण्यासाठी  साहेबांना सत्ता गाजवण्यासाठी  हे तरुणा, सार्वभौम देशाच्या कष्टाने मिळवा संधी रोजगाराच्या  टीचभर पोटाच्या उपजिविकेसाठी रक्ताच्या नात्यांच्या भरभराटीसाठी  १९ जूलै २०२३ पुणे

राज्यातील विस्थापित

एकदा एका राज्यात राज्याबाहेरील मोठ्या प्रमाणात विस्थापित लोकांचा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील बहुसंख्य लोक खूप विरोध करतात. अशा लोकांना अजिबात राज्यात रहायला देऊ नका म्हणून आरडाओरडा सुरू होतो. मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजवादी मंडळी राजाने त्यांना आश्रय दिला पाहिजे वगैरे वर समर्थन करू लागतात. तर सीमाभागातील बरेचशे लोक विरोध करतात. कारण त्यांना माहित असतं की अशी मंडळी मुख्यत्वेकरून सीमेलगतच्या भागात बस्तान बसवतात आणि त्यांच्या मुळे मूळ भूमिपुत्रांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी प्रतिकार म्हणून राज्यातील अनेक लोकांना एकत्र करून विस्थापित लोकांना आसरा देऊ नये म्हणून निदर्शने करण्यात आली. राजा आणि प्रधानावर खार आऊन असलेली मंडळी राज्यात भरपूर होती पण राज्यकारभारात पूर्वीसारखे उपद्व्याप करता येत नसल्याने निपचित पडून राहिले होते. एकाएकी त्यांच्यात स्फुरण चढले. टूलकिट वाल्यांनी लागलीच इव्हेंट मॅनेजमेंट करून महौल तयार केला. इकडचे समर्थक तिकडचे समर्थक नुसता हैदोस चालू होता. रास्ता रोको, रेल रोको वगैरे महोत्सव गोष्टी धुमधडाक्यात साजरे केले. सर्वसामान्य जनतेला या सगळ्यात नाहक त्रा

गडबडलेलं राजकारण

गडबडलेलं राजकारण लेख - १ भारतीय राजकारणात सर्वात नशीबवान पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी. कारण भक्तांना जेवढे ते प्राणप्रिय तेवढेच ते त्यांच्या विरोधकांचे नावडते. विरोधक, मोदीद्वेष्ट्ये, अगदी विचारवंत म्हणवून घेणारे स्वयंघोषित पण मोदींना प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरतात. त्यामुळे आजवर कोणत्याही पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्तीला एवढं फुटेज कधीही मिळाले नाही. राजकीय पक्ष कसा असावा आणि व्यवस्थापन कसे करावे यासाठी भाजपाची कार्यशैली फार महत्वाची आणि अभ्यास करण्यासारखी आहे. स्थानिक पातळीवरील समस्यांना देखील मोदींना जबाबदार धरून विरोधकांनी गेल्या सात वर्षांत आम्ही कसे सत्तेत येण्याच्या लायकीचे नाही हेच दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपावर खूप मोठी जबाबदारी आहे. सत्तेत राहून सत्ता डोक्यात जाऊ न देणे. नाहीतर असले दळभद्री विरोधक सत्तेवर येतील. मुळातच विरोधकांनी कसे वागावे, कशा पद्धतीने लोकांसमोर सरकारच्या कामांची चिरफाड करावी, सरकार विरोधातील राग, द्वेष जनतेच्या मनात पेटवून तो मतपेटीतून सरकार विरोधात कसा वाढेल असे प्रयत्न करणे गरजेचे असते. तसे प्रयत्न भाजपाच्या एका फळीतील कार्यकर्ते लोकांनी तळ

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

एका राज्यात गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे लोक एकाएकी धर्म, प्रार्थना स्थळे यावरुन भांडू लागले. राजाला प्रश्न पडला असं अचानक एकदम कसं झालं. त्यानं तातडीने प्रधानास बोलावलं. प्रधानाने राजाला सांगितले की समाजकंटकांनी हे सगळं सुरू केले आहे. जर वेळीच यावर उपाय केला नाही तर धर्मावरुन जनक्षोभ उसळेल. राजाने विचारले ही समाजकंटक मंडळी आहेत तरी कीती. त्यांचाच बंदोबस्त करून टाका कायमस्वरूपी. प्रधानाने सांगितले ते शक्य नाही. जे समाजकंटक ज्या धर्मातील आहेत त्यांच्या मागे मोठी इकोसिस्टिम उभी आहे. त्यांना दडपून टाकलं तर त्या त्या धर्माच्या लोकांना काबूत ठेवणे शक्य नाही. त्यांची शक्ती खूप वाढलेली आहे. यावर काय उपाय करावेत या विचारात असतानाच राजा प्रधानाला सांगतो की उद्या आदेश काढा. आपल्या राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण, समाजातील द्वेष लोकांमधील सलोखा बिघडवत आहे. तो थोपविण्यासाठी राज्य सात कलमी कायदा लागू करेल ज्यात सर्व धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा, रुढी आणि चालीरिती यांचा बंदोबस्त केला जाईल. आणि जनता जुमानत नसेल तर हुकुमशाही प्रमाणे माझी राजवट आमलात आणून सगळ्या धर्मातील कट्टरपंथी संघटना कायमस्वरूपी बंद

तो एक विद्रोही

हा पण विद्रोही तो पण विद्रोही पण तो नंतरचा विद्रोही हा मात्र मुळचा विद्रोही  तो जातीवंत विद्रोही हा नवा विद्रोही तो जुना विद्रोही हा पुरातन विद्रोही तो नवजात विद्रोही तो अस्सल विद्रोही हा सलणारा विद्रोही तो कडवट विद्रोही हा तिखट विद्रोही तो सर्वसमावेशक विद्रोही हा झुंजार विद्रोही  तो प्रस्थापित विद्रोही हा विस्थापित विद्रोही तो सरकारमान्य विद्रोही हा समाजमान्य विद्रोही तो कार्यकर्ता मग्न विद्रोही हा मंत्रालय मग्न विद्रोही तो अनुदान प्राप्त विद्रोही हा विनाअनुदानित विद्रोही तो कायमस्वरूपी विद्रोही हा कालानुरूप विद्रोही  तो कोकणस्थ विद्रोही हा देशस्थ विद्रोही तो ब्राह्मणांचा विद्रोही हा ब्राह्मणद्वेषी विद्रोही तो नुसताच बामण विद्रोही खरा तोचि एक ब्राह्मणी व्यवस्थेचा विद्रोही प्रस्थापितांशी संघर्ष करणारा विद्रोही  वंचितांच्या न्याय, हक्कासाठी लढणारा विद्रोही © भूषण वर्धेकर २४ एप्रिल २०२३ पुणे

पुरस्कार

पुरस्कार - विडंबन (मूळ कविता केशवसुतांची - तुतारी) एक पुरस्कार द्या मज आणुनि मिरवीन मी जो मुक्तकंठाने भडकूनी टाकिन सगळी माध्यमे प्रदीर्घ ज्याच्या त्या चित्काराने असा पुरस्कार द्या मजलागुनी शासनाच्या परीटघडीचे व्यवहार असे जे आजवरी होतील ते मला सत्वरी भाषणे देता त्या समयी कोण पुरस्कार तो मज देईल? इकोसिस्टिम त्यांची खंबीर प्रशासन आंदण तुम्हाला हळूच ढापती लीलया महामेळावा जनसागराला पुरस्काराचे समालोचन हवे तर? सत्कार! ते बक्षिसे घेऊनी सुंदर, सोज्ज्वळ मोठी शिल्पे अलिकडले टीकाकार ते ओरडती धरुनी आपटूनी बोटे चित्कार करुद्या सर्वांना निषेध जाऊ द्या वाऱ्यावरती फेकुनी किंवा दुर्लक्ष करा न कळता प्रतिमा उंचवा हळूच! ठरवा पुढचे पुरस्कार कंपूत चला डोकं बुडवूनी सांप्रत काळ हा मिरवण्याचा सोशल मेडिया आहे साथीला गर्जूनी त्यावर फॉरवर्ड करा बसल्या जागी व्हायरल करा दिखाऊ पणा करु चला तर! लाळ घुटमळूनी सैल संचार गावोगावी हिंडून मैलभर गत इतिहासाची मढी उकरुन रक्तरंजित वसा उगाळून पाहिजेत रे! पुरस्कारांची रीघ जातपातधर्माचे भांडणं लावून जनसेवेला आणिती अडथळे एकामागोमाग सैरभैर मुद्दे अनैतिकता पदसिद्ध भले पुरस्कारार्थी ह

गावगोष्टी #१

एका गावात मोठी पाण्याची टाकी होती. टाकीचा उपयोग पाणी साठवण्यासाठी आणि लोकांना दैनंदिन जीवनात गरजेप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन ची सर्वोत्कृष्ट व्यवस्था उभी करण्यात आली होती. गावाची सगळी उपजिविका शेतीवरच होती. छोटेमोठे गावातले उद्योग होतेच. पण ते तुटपुंजे होते. तसं सांगितलं गेलं होतं ही व्यवस्था गावातील गोरगरीब जनतेसाठी उभी करण्यात आली आहे. शेतीसाठी, रोजच्या दैनंदिन वापरासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याची देखरेख आणि पाणीपुरवठा अंमलबजावणी साठी गावातील जनताच काही लोकांना निवडून देत होती. असे निवडून येणारे लोक मात्र पाणीपुरवठा व्यवस्थेचे मालक असल्यासारखे वागत होती. एकाच कुटुंबातील लोकांना पिढ्यानपिढ्या जनतेने निवडून दिल्यामुळे त्यांचा गोड गैरसमज झाला होता की ही व्यवस्था आमचीच. आम्हीच ही व्यवस्था राबवली, उभी केली. त्यांचा पुढचा काल्पनिक समाजमान्य गैरसमज असा होता की आम्हीच फक्त लोकांचे कल्याण केले आहे. आमच्यामुळेच गावातील गोरगरीब जनतेला पाणीपुरवठा झाला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी शेवटच्या घटकांपर्यंत कधीच पोचले नव्हते. ते कायमच दुर्लक्षित राहतील याची तजवीज चाणाक्ष निवडून येणाऱ

काव्यमय वडापाव

काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे कांदा मिरची मसाल्याचे फवारे गोलमटोल गोळे पीठात बुचकळून ओतीव कढईतल्या तेलात उकळून लालचुटुक चुराचटणी कणीदार घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार मऊ लुसलुशीत पावात कोंबून चवीला मीठमिरची कांदा कापून अटक मटक खवय्यांची चटक तहानभूक भागवायचं मिथक दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग  उदरभरण नोहे अखंड अभंग ©भूषण वर्धेकर २२ मार्च २०२२

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो!

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळेच लढले कोणी दक्षिणेकडे कोणी पश्चिमेकडे लढले उत्तरेतील, पुर्वेकडील कैक फासावर चढले अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले काही जीवानिशी मेले काही होरपळले विस्कटलेल्या चळवळीत कैक बिथरले बंड पुकारून कैक त्वेषाने निकराने लढले राष्ट्रवादी लेखणीचे चित्कार सर्वदूर पोचवले गेले  परदेशांतून जहालांनी हादरून सोडले ब्रिटिशांना देशातलेच मवाळ बरे वाटू लागले हुशारीने राजे राजवाडे आधीच ताब्यात घेतले संस्थानिकांना हेरून करारबद्ध गुलाम केले बेरकीपणे काही आंदोलने प्रॉक्टर्ड केली लोकसहभागातून काही उस्फुर्त झाली दुसऱ्या महायुद्धात वाताहत अंगलट आली संभाव्य लष्करी उद्रेकामुळे पाचर बसली ज्वलंत राष्ट्रवाद्यांच्या जरबेने गांगारुन गेले मवाळांतील सत्तापिपासू हेरले गेले ब्रिटिशांनी धर्माधिष्ठित राष्ट्रास बळ दिले सर्वधर्मसमभावाचे कंबरडेच मोडले सगळ्यात आधी ब्रिटीशांनी वापरले नंतर कॉंग्रेसने सत्तेसाठी मिरवले सर्वदूर सत्य अहिंसा ठसवले गेले प्रत्यक्षात अहिंसा असत्य वठवले गेले कित्येक दशकं गांधी बिचारे वापरले गेले जाज्वल्य सावरकर अडगळीत फेकले गेले सुटाबुटातून संविधान अंमलात आणले गेले बाबासाहेब ज