पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

AI ML Data Science in Education field

A.I., M. L. And data science © Bhushan Vardhekar AI, ML, Data Science related courses are currently considered as the most appropriate job oriented courses. At present, the overall education policy is being changed at the national level and the online virtual marketplace for teaching programming, coding, etc. becoming hyper to attract parents and their children. This is definitely at a loss for school going children. What once was in the field of engineering colleges, or even worse, will be in the field of AI, ML, data science such trendy courses. Because of the way in which marketing is being done there is no option other than AI, ML, Data Science courses to get new high paying jobs. This is a kind of blind propaganda. My personal opinion is that long ago in Maharashtra MSCIT courses were conducted and failed to cope up with ongoing job demand then. Same way these AI, ML, Data Science courses will be going to decline to cope up with new trends in the upcoming job market. This is becau

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस

ए.आय., एम. एल. आणि डेटा सायंस ©भूषण वर्धेकर सध्याच्या काळात सर्वात जॉब ओरीएन्टेड कोर्सेस म्हणून एआय, एमएल, डेटा सायंस कडे पाहिले जाते. सध्या एकूण राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक पॉलिसी बदलत आहे आणि त्याच अनुषंगाने लहानमुलांना प्रोग्रामिंग कोडिंग वगैरे शिकवण्यासाठी जी ऑनलाईन आभासी बाजारपेठ तयार होत आहे त्यामुळे भविष्यात नक्कीच तोटा होणार आहे. जे कधीकाळी इंजिनीअरिंग क्षेत्राचे झाले होते तसेच किंवा त्याहून भयंकर एआय, एमएल, डेटा सायंस या क्षेत्राचे होईल. कारण ज्या पद्धतीने एक मार्केटिंग केले जात आहे की नव्या भरपूर पगारांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी एआय, एमएल, डेटा सायंस चे कोर्सेस केल्याशिवाय पर्याय नाही. हा एक प्रकारचा आंधळा प्रचार केला जातोय. माझे व्यक्तिगत मत असे आहे की एम. एस. सी. आय. टी. चे कधीकाळी जसे तुडुंब कोर्सेस चालत होते तसेच काहीसे या एआय, एमएल, डेटा सायंस चे होईल. कारण एआय, एमएल, डेटा सायंस समजून घेण्यासाठी जी पार्श्वभूमी असावी लागते ती बहुतेक वेळा  बघितली जात नाही. तुम्हाला कोडिंग येते का नाही येत यापेक्षा तुम्हाला काही पॉप्युलर लायब्ररीज कश्या वापरायच्या आणि कोणत्या डेटा वर कशा पद्ध

कोरोनाने काय शिकवलं?

कोरोनाने काय शिकवलं? २०२० ची सुरुवातीच्या काळात चीनच्या कोण्या एका प्रातांत वुहान नावाच्या शहरात कोव्हिड-१९ नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातलाय एवढेच वाचण्यात आले होते. तथापि त्यासाठी लॉकडाऊन वगैरे केलेल्या शहरांबद्दल तत्सम बातम्या येत होत्या. भारतात पहिला रूग्ण  सापडला तो केरळात आणि मग अवघ्या देशातील एकेका शहरात संक्रमित होण्यास कोरोनाला वेळ लागला नाही. मग अवघा भारत कोरोनामय, लॉकडाऊन सँव्ही आणि हेल्थ कॉशस वगैरे झाला. भारतातील आरोग्याच्या कोलमडून गेलेल्या व्यवस्थेची लक्तरे यानिमित्ताने मांडली गेली. मुळात कोरोनाचा प्रसार हा रोखण्यासाठी संंसर्ग होऊ नये वा कमी प्रमाणात व्हावा अशा प्रकारची उपाययोजना करणे आवश्यक होती. काही ठिकाणी ती व्यवस्थित राबविली गेली तर काही ठिकाणी तीचे तीन तेरा झाले. संसर्ग ह्या एकमेव तात्काळ फैलावणाऱ्या गोष्टीबद्दल जी विशेष खबरदारी घ्यायला हवी होती ती न जमल्याने कोरोनाचा प्रसार बिनधोक झाला. मुळात आपल्या देशात संसर्ग हा कोणताही असो वैचारिक वा साथीच्या आजारांचा फैलावला की फैलावतोच. त्याच्यावर ताबा मिळवणे महाकठीण. कारणं अनेक आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला भलामोठा देश जो उभा