पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैचारिक - २

आरक्षणे देऊनही एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होईल याची सध्याच्या काळात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. कारण भारतीय शैक्षणिक व्यवस्था म्हणजे मराठीत इंडियन एज्युकेशन सिस्टीम बुरसटलेली आहे. म्हणजे ही व्यवस्था बदलायला मूळातच सुधारणा करून आणायला पाहिजे. महाराष्ट्रात शिक्षण सम्राटांनी जो धुमाकूळ घातलाय गेल्या वीस एक वर्षात ते अख्खा महाराष्ट्रानं पाहिलेय. कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालय, इंजिनिअरिंग, एमबीए कॉलेजेस, सीबीएसई स्कूल वगैरेची दुकानदारी तेजीत चालू होती. शिक्षकांचा पगार सहीने वेगळा तर हातात त्यापेक्षाही कमी मिळणार, अशी एक पिढी पोटापाण्यासाठी जोडधंदा म्हणून शेती, जमीनीचे व्यवहार, पॉलिसी एजंट अशा गोष्टी करण्यात गर्क होती. बेरोजगारीसाठी भाजपाला जबाबदार धरण्यापेक्षा रोजगारक्षम स्किल्ड युवक का तयार झाले नाहीत याचा विचार करायची गरज आहे. बेरोजगारी वाढण्यामागे शैक्षणिक व्यवस्थाच कारणीभूत असते. उगाच मोदीविरोधात आवई ठोकून मोकळं होण्यात काही अर्थ नाही.  भाजपा नक्कीच व्यवस्था परिवर्तन करेल मात्र आमचं हित सांभाळून करा नाहीतर मनुवादी सरकार म्हणून आम्ही शिक्का मारू अशी विरोधकांची मानसिकता

वैचारिक -१

कॉंग्रेस, भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष हे केवळ लोकशाहीचे मुखवटे आहेत. खरा देश चांडाळ चौकटी चालवत आहे. या चांडाळ चौकटीत देशातील व परदेशातील गुंतवणुकदार, कार्पोरेट  व इंडस्ट्रियल लॉबी, मेडिया हाउसेस मँनेज करणारे आणि तथाकथित धर्माचे ठेकेदार असे सगळे येतात. त्यामुळेच मतदानाच्या वेळी सर्वाधिक ध्रुवीकरणासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातपातधर्म. त्याचा वापर पुरेपूर करुन घेण्यासाठी राजकारणी नेहमीच तयार असतात. शिकले सवरलेले पण याला बळी पडतात. घडलेल्या घटनांचा केवळ जातपातधर्म यावर आधारित उल्लेख करणारे स्वतःला धर्मनिरपेक्ष वगैरे म्हणवून घेतात. आजचा काळ खऱ्या अर्थाने सदैव सतर्कतेचा आहे कारण व्यक्त झालेले संवाद आणि लेखणीतून झिरपलेले शब्द कुठेना कुठे नोंद केला जातोय हे ध्यानात ठेवले पाहिजे. समाजमाध्यांचा अविरतपणे केला जाणारा भडीमार याला कारणीभूत आहे. विशेषतः अमुक एका गटाला लक्ष्य करून वृत्तांकन केले जाणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. मग ते वृत्तांकन विरोधाचे असो वा समर्थनार्थ. एखाद्याविषयीची भूमिका सांगणं आणि कसलीही शहानिशा न करता सरळसरळ त्याला गुन्हेगार वा देवदूत ठरवणं हे सध्याच्या काळातील अत्यंत क

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या

असिफा, निर्भया आणि कोपर्डीची सुकन्या होय तुम्ही तिघी फार भाग्यवान आहात तुमच्यावर झालेल्या पाशवी अत्याचाराला वाचा फुटली सगळी माध्यमं तुमच्या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत, भारतातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक या घटनेचा निषेध करतोय पण, स्वार्थी, भांड मेडिया तुमच्या घटनांचा तपशील टिरापीसाठी रवंथ करतोय हुकलेले बिनडोक राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून संधी साधून घेताहेत संधीसाधू विचारवंत, कलावंत आपापली सोशल सेन्सेस जागरूक ठेवण्यासाठी सिलेक्टिव्ह निषेधाची नौटंकी करत आहेत सद्सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवून बरबटलेले ज्ञानी महात्मे जातपातधर्माच्या कुंठीत अस्मिता धारदार करतायत एक माणूस म्हणून सध्याचा समाज गाभडत चाललाय सत्तापिसासू परमपूज्य थुकरट माननीय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या उखळ-पाखळ काढण्यात व्यस्त आहेत ज्याला त्याला आपापली दुकानदारी चालवून प्रतिमा स्वच्छ करायचीय घृणास्पद आणि निर्घृण हे शब्द पण रुसलेत स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही आदेशाची वाट पाहत बसलेत निषेधासाठी षष्प झाल्या संवेदना अन् विकृतीचे उदात्तीकरण इथे सगळ्यांनाच न्यायालयाने आपापल्या सोयीन