पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले

जे जे शोषितांसाठी लढले  कामगारांसाठी हाल सोसले लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले विळा हातोड्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वंचितांसाठी लढले दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले अशोक चक्रांचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वर्चस्वासाठी लढले फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले विजयी उत्सवाचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे स्वराज्यासाठी लढले गुलामांना धर्माखाली बांधले सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे समाजासाठी लढले ऐहिक कल्याणासाठी टिकले चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे सर्वांगीण विकासासाठी लढले संधीसाधूंनी त्यांना मिरवले ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले सत्ताधीश बनून सरंजामीत रमले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे उपेक्षितांसाठी लढले रोजीरोटीसाठी रक्त आटवले समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले अल्

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं एकदा मी मराठ्यांवर  विद्रोही कविता केली महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं मग मी गुजरात्यांवर  विद्रोही कविता केली गुजराती अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं नंतर मी सरदारांवर विद्रोही कविता केली पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं मग मी चिडून हिंदी भाषिकांवर विद्रोही कविता केली उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं थोडसं सावरून तमिळींवर विद्रोही कविता केली तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं त्वेषाने तेलुगू लोकांवर विद्रोही कविता केली आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं नंतर मी मल्याळींवर विद्रोही कविता केली केरळी अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर विद्रोही कविता केली तिथल्या अस्मितावाद्यांनी मला ठोकून काढलं शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर  विद्रोही कविता केली तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण मला ठोकून काढलं सरतेशेवटी मी भारतीयांवर विद्रोही कविता केली एकदम सगळ्या सेक्युलरांनी  माझं कौतुकच केलं मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून मला ठोकून काढलं - भूषण वर्धेकर

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव

जय भीम - एक सुन्न करणारं वास्तव दिवाळीत अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला जय भीम चित्रपट म्हणजे व्यवस्थेत बऱ्याचशा ठिकाणी होणाऱ्या अमानुष छळाचं प्रातिनिधीक  भयाण वास्तव आहे. चित्रपटासारखे प्रभावशाली माध्यम संवेदनशील घटना लोकांसमोर मांडण्याचा एक यशस्वी प्रयोग आणि पायंडा कैक वर्षापासून चालत आलेला. सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात असे चित्रपट आले की चर्चा होतात, वेगवेगळे लेखनप्रपंच केले जातात व्यवस्थेतील त्रुटींवर. मग नवा काहीतरी मुद्दा येतो आणि पुन्हा ज्या विषयांवर घटनेनुसार बदल व्हायला हवेत त्या गोष्टी बासनात गुंडाळल्या जातात. समस्या जैसे थे राहतात आणि बिनकामी चर्चा, आरोप, प्रत्यारोप, तर्क, वितर्क आणि राजकीय लबाड आश्वासने निरंतर चालूच राहतात. समस्येवर तोडगा काढण्यापेक्षा इतर गोष्टी व्यवस्थेत रेंगाळत राहतात. जय भीम मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तामिळनाडूतील तत्कालीन दुर्लक्षित आदिवासींच्या होणाऱ्या छळाची गोष्ट सांगितली आहे. चित्रपट बघितल्यावर मन सुन्न होते. निष्पाप लोकांचा झालेला हिंसक छळ कोणालाही सुन्न करतोच. मात्र तेच निष्पाप लोक जातपातधर्माच्या चौकटीत अडकवले की व्यवस्थेचे खरे स्वरूप उघ

सरदार उधम: एकमेव संकीर्ण स्वातंत्र्यपूर्व एकाकी लढा

ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित झालेला सरदार उधम हा चित्रपट नक्कीच न चुकवण्यासारखा आहे. शुजित सरकारचे दिग्दर्शन आणि विकी कौशलचा अभिनय अफाट आहे. एकूण स्वातंत्र्य मिळण्याआधीची पार्श्वभूमी ज्या पद्धतीने उभी केलीय त्याला तोड नाही. हा नसिनेमा आजच्या काळात महत्त्वाचे विधान करतो. सध्याचा काळ हा श्रेयवादासाठी आसुसलेल्या पक्षांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचा आहे. हा सिनेमा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची जी गोष्ट सांगतो ती फार महत्त्वाची आहे. सरदार उधम यांचा एकाकी लढा, सूडाची भावना आणि त्यामागची कारणमीमांसा जबरदस्त कन्व्हीक्शनने मांडलेली आहे. १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास निरखून बघायचा असेल तर एलन ह्यूम ने जे कारनामे केलेत त्यापासून सुरुवात करायला पाहिजे. १८५७ चा लढा आणि नंतरचे झालेले लढे. १९४२ च्या लढ्याला असलेले वेगवेगळे कंगोरे समजून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी त्याकाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची भुमिका अभ्यासणे फार महत्त्वाचे आहे. समांतर पणे बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष पण महत्त्वाचा आहे. नंतर टिळकांच्या आधीचे लढे टिळकांच्या नंतरचे लढे फार महत्त्वाचे आहेत. आणि हो सोब