शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं

अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं


एकदा मी मराठ्यांवर 
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी गुजरात्यांवर 
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्वेषाने तेलुगू लोकांवर
विद्रोही कविता केली
आंध्रा, तेलंगणातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

नंतर मी मल्याळींवर
विद्रोही कविता केली
केरळी अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

त्यानंतर बंगाली, ओरिया लोकांवर
विद्रोही कविता केली
तिथल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं

शेवटी मी ईशान्येकडील लोकांवर 
विद्रोही कविता केली
तिकडल्या अस्मितावाद्यांनी पण
मला ठोकून काढलं

सरतेशेवटी मी भारतीयांवर
विद्रोही कविता केली
एकदम सगळ्या सेक्युलरांनी 
माझं कौतुकच केलं
मात्र राष्ट्रवाद्यांनी शोधून
मला ठोकून काढलं

- भूषण वर्धेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भैरु पैलवान की जय!

गावातील भैरु पैलवान पंचक्रोशीत लय फेमस व्हता. कुणाच्या अध्यातमध्यात नसतंय म्हणून. गपगुमान आपआपली कामं करायची, सकाळ संध्याकाळ कसरत करायची, ता...