पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यक्तिस्तोमाचे डंके

व्यक्तिस्तोमाचे डंके वाजू लागले की समजून जायचे अनुयायांना करण्यासाठी काहीच राहिलेलं नाहिए. मुळात आपण भारतीयांना गुलाम होणे फार आवडते. सुरुवातीला अधीन होऊन दीनदुबळ्यासारखे शरण जातो. यामुळे लाचार होणे ठरलेलं असतं. भारतात सगळ्याच महापुरुषांच्या नावाने जो खेळखंडोबा करून ठेवलाय तो त्यांच्याच अनुयायांनी. एखादी व्यक्ती श्रद्धेय असेल तर तिच्या वाईट गोष्टी पोटात घालून उदो उदो करून अंधभक्तांच्या फौजेत सामील होणं हे भारतीयांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. नीर क्षीर विवेक हा केवळ पाठ्यपुस्तकापुरता. आवडत असलेली वा जवळ वाटणारी विचारसरणीचा नेता हाच तो चांगला बाकी सगळे वाईट याच एका मुद्यावर सुजाण नागरिकांचे गट तट पडलेले आहेत. सोयीस्कर भूमिका घेणे हे सध्याचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. २०१९ मध्ये आहोत याचं कसलही भान नाही. केवळ भूतकाळात आमच्यावर अन्याय झालाय म्हणून अमुक एका गटाकडून तमुक एका गटाचा द्वेष करणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं हेच दूर्दैव आहे देशाचं. आज अवतीभवती जो कल्लोळ माजलाय तो गेल्या चार पाच वर्षातला नसून गेल्या कित्येक वर्षांपासून लपूनछपून ज्या गोष्टी चालू होत्या. त्यातील बऱ