सोमवार, १० एप्रिल, २०२३

काव्यमय वडापाव


काळ्याकुट्ट मातीत मुळाशी गाडलेला
टुम्म फुगीर रुंद बटाटा पसरलेला
घाऊक बाजाराच्या रचलेल्या पोत्यातून
भल्यामोठ्या पातेलात रटारटा शिजवून

ठेचून चेंदामेंदा झालेली लक्तरे
कांदा मिरची मसाल्याचे फवारे
गोलमटोल गोळे पीठात बुचकळून
ओतीव कढईतल्या तेलात उकळून

लालचुटुक चुराचटणी कणीदार
घोटलेल्या चिंचेचा अर्क पाणीदार
मऊ लुसलुशीत पावात कोंबून
चवीला मीठमिरची कांदा कापून

अटक मटक खवय्यांची चटक
तहानभूक भागवायचं मिथक
दंत ओष्ठ्य जीव्हा खाण्यात दंग 
उदरभरण नोहे अखंड अभंग

©भूषण वर्धेकर
२२ मार्च २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

डावे चष्मे उजवे चष्मे

  डावे चष्मे उजवे चष्मे डावे चष्मे उजवे चष्मे गोल गोल चष्मे अभिनय करतो चांगला पण जेव्हा समजले आहे डावा  रटाळ अभिनेता नकोसा वाटला  तिचा आवाज ...