हा आसमंत माझा

हा आसमंत माझा
मी अनन्यसाधारण त्यापुढे
उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर
कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर
गजबजलेल्या तिन्ही दिशा माझ्या पाठी
नजर मात्र रोखून उर्वरीत दिशेला
गरजत आलो मी जिंकून नैराश्य
अनंत अवकाशात मी फैलावून बाहू
गतकाळच्या चुका चूलीत घालून
नवनिर्माणाच्या हाकेला सकारात्मक हुंकार
किर्र अंधारातली तिरिप हाताशी
उजळून टाकाया आयुष्य सुंदर
मी तयार आहे… या दुःखांनो
झेलायला अणूकुचीदार शस्त्रे
निधड्या छातीने सामोरे जाऊन
खंबीरतेने मागे न रत्तीभर हटता
ऊठा.. ऊठा.. भूमीपुत्रांनो
वैरी आपल्याच मानगुटीवर
खेचा खाली त्याला
तुडवा पायदळी.. फडकवा लक्तरे त्याची
म्यान झालेल्या तलवारी पुन्हा उसळू द्या
भेदून टाका त्या जखमा विव्हळणाऱ्या..
कुरवळणाऱ्या धुंदीत गुलछबू मनाच्या
चिरफाड करा तुमच्या नतद्रष्ट संकुचित विचारांची
येऊद्यात फुत्कार मानव्याचे
ससेहोलपटत असणाऱ्या शूद्र मनाला
पोकळ विचारसरणीचा आधार
द्या झुगारून अखंड वरात
तुम्हाला मागे खेचणाऱ्यांची
घ्या हाती शस्त्रास्त्रे बिमोड करायला
कमकुवत स्वप्ने अन् मुडदूस ध्येयाची करा राखरांगोळी…..
एक व्हा… सज्ज व्हा.. दक्ष व्हा…

----------------------------
भूषण वर्धेकर
१४ जूलै २०१६
रात्रौ १०:००
हडपसर
-----------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठा आरक्षण आणि वास्तव

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध