रविवार, ३० एप्रिल, २०१७

आयुष्याच्या उधळलेल्या


आयुष्याच्या उधळलेल्या आकांक्षा
आक्रोशातल्या होरपळलेल्या भावना
भावबंधाचे निसटलेले किनारे
करूणेचे ढासळलेले मनोरे

गाभाडलेल्या ईच्छा अन् मनोकामना
निखाऱ्यात विसावल्या संवेदना
मर्दुमकीचे फोडलेले अचाट टाहो
चिरकाल धुमसत स्मरणात राहो

एकांतातले निपचित विचारचक्र
गर्द आठवणीत पाणावलेले नेत्र
कस्पटासमान रूतलेले आस्तित्व
विरहातलं एकलकोंड ममत्व

पुसलेल्या पाऊलखुणांच्या वाटा
अनाकलनीय गूढ जगरहाटा
हुंदक्यामधली सूक्ष्म स्पंदने
कर्दमलेली आभासी मने

घुसमटीची कर्णकर्कश्य ललकार
स्वप्नांतल्या दुनियेची तीक्ष्ण चिरफाड
काळोखाच्या अतर्क्य उलाढाली
मेटाकुटीचे जगणे नियतीच्या  हवाली

---------------------------
-- भूषण वर्धेकर
 हडपसर, पुणे
रात्रौ ११:००
१७ एप्रिल २०१७
-----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी! एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थि...