पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Her Voice Her Choice

Her Voice, Her Choice Her decision, Her life Her distorted life, Family problem Her repentance, Curtural problem Her broken mind, Career problem Her love life, Society matter Her success, Women empowerment Her failures, Male dominance Her excessive demands, Pampered parents problem Her chaste emotions, Humiliated men problem Her social duties, Our religious problem Her freedom of expression, Progressive beliefs problem  Her murder, Our problem Her rape, Patriarchal problem ©Bhushan Vardhekar  15 November 2022 Pune - 412115

लढाई

आमची लढाई, तुमची लढाई त्यांची लढाई, ह्यांची लढाई आतली लढाई, बाहेरची लढाई गल्लीतील लढाई, दिल्लीतील लढाई मनातील लढाई, घरातील लढाई एकट्याची लढाई, दुकट्याची लढाई शांततेसाठी लढाई, वर्चस्वासाठी लढाई रक्षणासाठी लढाई, संरक्षणासाठी लढाई मिरवण्याची लढाई, दिखाव्याची लढाई आस्तित्वाची लढाई, निकराची लढाई  अटीतटीची लढाई, मेटाकुटीची लढाई  शहाण्यांची लढाई, मुर्खांची लढाई गटागटात लढाई, तटातटात लढाई सामाजिक लढाई, राजकीय लढाई जातीअंताची लढाई, जातीपातीची लढाई विचारांची लढाई, आचारांची लढाई सत्तेची लढाई, खुर्चीची लढाई मंत्र्यांची लढाई, नेत्यांची लढाई पदांची लढाई, प्रतिष्ठेची लढाई भक्तांची लढाई, गुलामांची लढाई अंधश्रद्धेशी लढाई, प्रथांशी लढाई रुढींशी लढाई, परंपरांशी लढाई दैववादी लढाई, विवेकवादी लढाई सांस्कृतिक लढाई, सदाचारी लढाई  पक्ष वाढवण्याची लढाई, पक्ष संपवण्याची लढाई बंड क्षमवण्याची लढाई, बंड पेटवण्याची लढाई सरकार करण्यासाठी लढाई, सरकार पाडण्यासाठी लढाई विरोधकांची अंतर्गत लढाई, विरोधकांची कमीशनची लढाई जनतेची जगण्याची लढाई, महागाईशी कमाईची लढाई, बेरोजगारीशी बेकारांची लढाई, शेतकऱ्यांची निसर्ग...

समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री

१. सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नसलेल्या परकीय लेखकांच्या पुस्तकांची यादी तयार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती वाचावी २. ही माहीती मराठीत अशा पद्धतीनं लिहायची की वाचणाऱ्याला मूळ लेखकाचे सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य कोळून प्यायला की काय असं वाटावं! ही लिहिलेली माहिती सोप्या आणि जड भाषेत लिहून समाज माध्यमातून पोहोचवावी. सोपी भाषा सर्वसाधारण वाचक तर जड भाषा प्रगल्भ वाचक. ३. प्रगल्भ वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास असे वाचक कसे फक्त लोकप्रिय आणि रसिकप्रिय लेखकाची पुस्तके वाचतात यावर काथ्याकूट करायचा. अशी मंडळी कशी प्रतिगामी अवैज्ञानिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेची असतात यावर पोष्टी पाडायच्या.  ४. सर्वसाधारण वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास अशा वाचकांना साहित्यिक जाणच नाही यावर प्रदीर्घ पोस्ट लिहायची. त्यात त्यांच्यावर ब्राह्मणवादी संस्कृती आणि सनातन विचारांचा प्रभाव कीती खोलवर आहे असे टिकात्मक लिखाणातून ठोसपणे लिहायचे. ५. जर दोघांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर. तर भांबावून न जाता क्रमांक १,२ आणि ३ ची च्या कृती पुन्हा करायच्या. फक्त प्रगल्भ वाचकांना ठाऊक असलेल्या परकी...

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट

रॉकेट्री - द नंबी इफेक्ट आर. माधवन दिग्दर्शित रॉकेट्री चित्रपट नव्या युगात वैज्ञानिक राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ ठरेल असा बनवला आहे. आजवर ऐतिहासिक राष्ट्रवाद ऊतू जाईल एवढे सिनेमे आलेले आहेत. अशा प्रत्येक चित्रपटात कोणाला कोणीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. किंवा शत्रू पक्ष म्हणून ठरवून चित्रपटाची बांधणी आणि मांडणी करतात. रॉकेट्री चित्रपट मात्र भलेही राष्ट्रवाद, वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी यावर आधारित असेल तरीही भडक आणि भंपक वाटत नाही. यात कोणीही कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून कसलेही आडाखे तडाखे दिलेले नाहीत. काही शक्यता असू शकतात, प्रशासन शासन आणि यंत्रणा यातील त्रुटींवर तिखट भाष्ये केली आहेत. वैज्ञानिक क्षेत्रातील संस्था कशा काटकसरीने कारभार करतात हे यात व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने दाखवले आहे. अर्थातच नंबी नारायण यांच्या आयुष्यातील आलेले आणि आणलेले चढ उतार आर. माधवनने काही फिल्मी तर काही रोमांचक पद्धतीने दाखवले आहेत. आर. माधवन तसा जबरदस्त टॅलेंट असलेला अभिनेता. या सिनेमात अभिनयाच्या बाबतीत तर तो उजवाच ठरलाय. दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा समोर येतोय. सिनेमा मेकिंग चे बारकावे टिपण...

दि ग्रेट एडव्हेंचर

  नथुराम गोडसे आणि औरंगजेब एकाने एका हिंदूला मारले दुसऱ्याने अनेक हिंदूंना मारले नथुरामचे समर्थन करणारे नेहमीच द्वेषाचे धनी असतात औरंग्याच्या कबरीवर फुले, चादर चढवणारे इतिहासाची आब राखणारे असतात म्हणे थोडक्यात काय, तुम्ही एकाला मारता की अनेकांना यावरून इतिहासात खलपुरुष ठरतो एकाला मारण्याचा इतिहास पारदर्शक असतो अनेकांना मारल्याचा इतिहास संदिग्ध असतो कबर, समाधी आणि अस्थी ज्याची त्याची प्रेरणास्थाने आजूबाजूला मांडली गेली अलौकिक वैचारिक दुकाने दुकाने चालण्यासाठी विक्रेता, ग्राहक, उत्पादक सदैव सत्पर सोबत येतातच गुंतवणूकदार, विपणन शीघ्र सत्वर प्रत्येकाने नेमलाय एक्स्लुसिव्ह डीलर विथ एक्सीक्युटिव्ह एरिया मॅनेजर धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती हे संविधानाने बांधणे हेच दि ग्रेट एडव्हेंचर ©भूषण वर्धेकर १९ मे २०२२ पुणे

मी वसंतराव

मी वसंतराव - कलाकाराचा मनस्वी संघर्ष एखाद्या कलाकाराला किती पातळीवर संघर्ष करावा लागतो ते केवळ तो कलाकार आणि त्याचे सखेसोबतीच जाणतात. त्यांच्या संघर्षाचे असे काय महत्त्व जे त्यांच्या कलेत उतरते? ते बघायचे असेल तर सध्याचा मी वसंतराव हा चित्रपट बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात असे अनेक कलाकार लोकांपर्यंत उशिरा आले. पण जेव्हा आले तेव्हा कायमस्वरूपी आरूढ झाले. मी वसंतराव हा चित्रपट फक्त वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आहे का? नाही तो फक्त एक बायोपिक नसून महाराष्ट्रात नाटक, संगीत वगैरेवर घडामोडींचा एक कालपट आहे. ज्यात वसंतरावांचा एका पठडीबाहेरील गवय्याचा प्रवास आहे. वसंतराव रुढार्थाने कोण्या एका घराण्यातील नावाजलेले गायक नव्हते. त्यांनी गाण शिकण्यासाठी जो संघर्ष केला स्वतः मध्ये गाणं जीवंत ठेवून जगण्यासाठी जी धडपड केली त्याचा जातीवंत लढा चित्रपटात दाखवला आहे. चित्रपटात कुठेही अतिरिक्त आर्टिस्टिक लिबर्टी घेऊन उगाचंच काहीही घुसडलेलं नाही. वसंतरावांचा एकाकी प्रवास त्यात आपसूकच येणारे कुटुंबीय आणि जीवाभावाचे सखेसोबती याची सांगीतिक मैफल आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शन तोडीस तोड जमलंय.  रसिकांना मंत्...

आरंआरंआरं

आरं आरं आरं बाबाओ, काय बघितलं मी कायचं समजून न रहायलं.. आरं आरं आरं एका आदीवाशी पोरीला इंग्रजाची बायको घेऊन जाते मग इंग्रज कश्शे निष्ठूर असत्याय ते बी पिक्चर मध्ये येतंय. मग आदीवाशी लोकांचा भीम नावाचा पयला  हिर्रो त्या मुलीला आणण्यासाठी दिल्लीत धडक मारतो. वेश बदलून अख्तार म्हणून राहतो. तोवर इकडे इंग्रजांची पोलीससेवा करणारा दुसरा हिर्रो राम हा लय भारी हजारो लोकांचा मार खाऊन तितक्याच लोकांशी मारधाड करून एका माणसाला अटक करतो. दोन्ही हिरोंची भेट व्हण्यासाठी एका गरीब बिचाऱ्या पोराला यमुना नदीत मासे पकडायला पाठवत्यात. मग मग नदीवरच्या पुलावरनं रेल्वे जखताना डायरेक्ट लोखंडी चाकाला आग लागते मग तीच आग पाण्यात पण लागते. मधोमध तो बिचारा पोरगा. नंतर हाय लय भारी स्टंट. एक हिरो इकडून घोड्यावर दुसरा हिरो तिकडून फटफटीवरुन कमरंला दोरी बांधून खाली पुलावरनं उड्या मारत्यात. घोड्यावरचा हिरो उडी मारताना 'वंदे मातरम' लिवलेला झेंडा घेतो. (हा झेंडा सावरकर, भिकाजी कामा व शामजी कृष्ण वर्मा यांनी डिझाइन केलेला आहे १९०७ साली. वाचकांच्या खास माहिती साठी. १९०४ ते १९३१ काळात झेंड्याच्या डिझाइन मध्ये वेगवेगळे ब...

विवेकवादी हतबलता - उत्तरार्ध

विवेकवादी हतबलता एका राज्यात विवेकवादी लोकांच्या दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या होऊ लागल्या होत्या. धर्माच्या नावाखाली एकत्र येऊन बरेच ठिकाणी हिंसक प्रदर्शने होऊ लागली. अचानकपणे राज्यात धर्माच्या नावाखाली अनागोंदी माजतेय की काय असा प्रश्न राजाला पडला. राजाने तात्काळ फर्मान सोडले आणि प्रधान आणि कायदा सुव्यवस्था मंत्र्यांची बैठक बोलावली. प्रधांनांनी जे काही घडतंय त्याची सगळी हकिगत, त्यामागील षडयंत्र करणारे यांची माहिती घेऊन लागलीच महाराजांना सांगितली. राजाने सगळं ऐकल्यावर गंभीर मुद्रेने प्रधांनाकडे मागणी केली की अशा धार्मिक उन्माद करणाऱ्यांना कायमचा जेरबंद करूच पण यांना छुप्या पद्धतीने पोसणाऱ्या लोकांना, संघटनांना पण ठेचून काढू. म्हणजे भविष्यात परत विवेकवादी लोकांच्या हत्या होणार नाहीत. त्यासाठी करावे लागेल ते निर्भिडपणे आपण करू. कायदा सुव्यवस्था पाहणाऱ्या मंत्र्यांना पण कडक कारवाई करा, कोणाचाही हस्तक्षेप झाला तर मला लागलीच कळवा, मी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे असा आदेश दिला. प्रधानांनी महाराजांना सांगितले की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेत अशा गुन्हेगारांना अजिबात कडक शिक्षा करता येत नाही. धार्मिक...

काश्मीर फाईल्स

दि काश्मीर फाईल्स - अस्वस्थ करणारा अनुभव सिनेमा पाहताना जर अस्वस्थ वाटत असेल तर त्या सिनेमाचा कंटेंट आणि कंटेक्स्ट योग्य जागी प्रहार करतो. अर्थातच सगळेच मनाला भिडणारे सिनेमे ह्यूमन लेवल वर करूण वाटतात. ठणकावून आणि ओरबडून सत्य सांगणारे सिनेमे फार कमीच. त्यापैकी काश्मीर फाईल्स. काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल तिखट आणि तीव्र भाष्य करणारा सिनेमा. काही लोकांना हा सिनेमा प्रोपागंडा वाटतो कारण त्यांच्या डीप नॅरेटिव्हला धक्के बसतात म्हणून. सेट केलेलं नॅरेटिव्ह जर खोटं पडू लागलं की जळफळाट, तळमळ, खदखद बाहेर येणं सहाजिकच आहे. मात्र जे काही दाखवले आहे काश्मीर फाईल्स मध्ये ते सत्य घटनेवर आधारित आहे. कपोलकल्पित कथांवर तर नक्कीच नाही. कारण या सिनेमासाठी जो रिसर्च केलाय तो सिनेमा बघताना आतून हादरवतो. अतिरेक्यांनी पंडितांवर हल्लेच केले नाहीत असं जर कोणाचं म्हणणं असेल तर पंडित काश्मीरमध्ये का राहिले नाहीत? विस्थापित का व्हावे लागले पंडितांना? अर्थातच अतिरेक्यांनी गुलाबपुष्प देऊन पंडितांना काश्मीर सोडा म्हणून तर सांगितले नव्हते!  आपल्याच देशात  मूळ रहिवाशांना आपापल्या घरादाराला सोडून त्रयस्थ ठ...

एका स्त्रीवादी बाईचा महिला दिवस

सकाळी सकाळी मोबाईलवर आलेले प्रमोशनल मेसेजेस वाचून एक स्त्रीवादी बाई फारच वैतागली. मेसेज होता एका ऑनलाइन शॉपिंगच्या सेल संदर्भात. महिला दिनानिमित्त किचन एप्लायन्सेसवर भरघोस सूट. दुसरा मेसेज होता साड्यांच्या सेलबद्दल. त्यातील एक वाक्य होते.  'वुमेन इन सारीज् लूक्स मोअर ट्रेडिशनल. हॅप्पी शॉपिंग' सकाळीच असे मेसेजेस वाचल्यावर बाईंचे पित्त खवळले. बातम्या बघण्यासाठी टिव्ही लावला तर स्त्रीया आता पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आघाडीवर वगैरे बाबतीत चर्चा चालू होत्या त्यात फक्त अँकर बाई होती आणि चर्चेसाठी बोलावलेल्या पॅनलवर पाचपैकी एकच स्त्री होती. बाकीचे चार म्हणे फेमिनिस्ट मेल होते. हे बघून बिचारी स्त्रीवादी एकदम फेमिनाझी झाली. 'फ' वर्गातील आंग्ल शिवी हासडून टिव्ही बंद करून मोबाईलवर स्क्रोल करू लागली. व्हॉट्सऍप ग्रुपवर वुमेन्स डे निमित्ताने येणाऱ्या पानाफुलांच्या, कवितांच्या, इमोजींच्या, सुविचारांच्या गराड्यात गोंधळून गेली. फेसबुकवर टॅग केलेल्या मैत्रिणींच्या नवऱ्यांच्या पोस्टींचा महापूर पाहून 'एक्स'च्या पोस्टवर थबकली. आपल्या एक्सला बायको म्हणून काकूबाई घर सांभाळण...

झुंड

झुंड झुंड मध्यंतरानंतर मनावरील पकड कमी करतो. बरेच ठिकाणी प्रेडिक्टेबल होतो. नागरजचे फँड्री आणि सैराट जसे मनावर गारूड करतात तसा झुंड करत नाही. सिनेमा संपल्यानंतर नागराज स्पेशल होल्ड झुंड बघितल्यावर राहत नाही. झोपडपट्टी मधल्या पोराटोरांचे मानसशास्त्र, सामाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानवतावाद सगळं एकाच सिनेमातून का दिलं गेलं असा प्रश्न पडतो. कलरफुल सिनेमा, प्रत्येक नॉन एक्टर कडून करवून घेतलेली कामे, संवाद, सिम्बॉलिक फ्रेम्स आणि सिनेमॅटोग्राफी आशयाला अनुसरून शोभत असली तरी शेवटपर्यंत खिळवून ठेवत नाही. धक्कातंत्र देण्याचे नागराजचे कसब इथे फिके पडते. मला व्यक्तीगत सिनेमा पाहताना नामदेव ढसाळ आणि जयंत पवार यांच लिखाण वाचल्यावर जे दृश्यं उभे राहिले होते तसा भास झाला. झोपडपट्टी मधल्या तरुणांना एकत्र घेऊन फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणं लोकांना अपील होईल असं वाटत नाही. कारण स्पोर्ट्स फिल्म्स बनवण्यासाठी जे तंत्र लागते लोकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याचे ते तंत्र इथे नाही. केवळ फुटबॉल खेळात गुंतून राहिल्याने त्यांचे प्रश्न सुटणार का? नाही सुटणार. कारण ते दुर्लक्षित राहिले म्हणून मुख्य प्र...

प्रत्येकाचं बरं चाललंय

प्रत्येकाचं बरं चाललंय आपापलं राखून ठेवलंय काहींनी वाटून घेतलंय उरलेल्यांनी हेरून ठेवलंय कोण कोणाला जीवे मारतो कोण कोणावर हल्ले करतो कोण कोणाची कोंडी करतो त्यावर प्रत्येकाचा निषेध ठरतो साम्राज्याचा विस्तारवाद युद्ध करते स्वराज्याचे सीमोल्लंघन क्रांती करते इतिहासकारांची ढोंगी लेखणी चाचरते कुठे सशस्त्र लढा, कुठे युध्दाची खुमखुमी ठरते  हल्ल्यांच्या भीतीपोटी शस्त्रे घ्यावी संरक्षणासाठी दिखाऊ अस्त्रे दाखवावी पत नसेल तर आर्थिक मदत घ्यावी श्रीमंत तिजोरीत भर पडावी असेल अभेद्य राष्ट्रवाद जर अंतर्गत ऐक्य करावे जर्जर लक्ष वेधून जातपातधर्मावर वार करा सामाजिक सलोख्यावर राष्ट्राच्या इतिहासाची करावी तोडमोड संस्कृती, सभ्येतेची करून पडझड फुस लावून असंतुष्टांची रडारड राष्ट्रविघातक अंतर्गत वरचढ शांततावादी भूमिका घेऊन तत्पर दुसऱ्यांच्या माथी फोडावे खापर महाशक्तीचे कौतुक गोडवे जोरदार नफेखोरीचे शस्त्रास्त्र व्यवहार © भूषण वर्धेकर ४ मार्च २०२२, पुणे

आमचं तुमचं

आमची असते कायदेशीर कारवाई तुमची असते सूडबुद्धीची कारवाई आमची असते संविधानिक दुरुस्ती तुम्ही करता ते संविधानाची तोडमोड  आमचा असतो अस्मितेचा अंगार तुमची असते ती द्वेषपूर्ण नौटंकी  आमची असते लोकशाहीतील एकी तुमची असतात स्पॉन्सर्ड आंदोलने आम्ही मांडतो भूमीपुत्रांचे मुद्दे तुम्ही मांडता सुपारी घेऊन प्रश्न आमचा असतो रस्त्यावरचा लढा तुम्ही करता तो खळखट्याक राडा आम्ही टाकतो नियमानुसार धाडी तुम्ही करता जाणूनबुजून मुस्कटदाबी आम्ही देतो कायदा-सुव्यवस्थेची हमी तुम्ही देता तो गोरगरिबांचा बळी आमचे चालते ते प्रामाणिक प्रशासन तुम्ही करता ते हुकूमशाही शासन आमचा पिंड पारदर्शी व्यवहाराचा तुमचा असतो पाढा भ्रष्टाचाराचा आमच्या विजयात असतो मतदारांचा कल तुमच्या विजयात मात्र ईव्हीएम ची गडबड आमचा पराभव ठरतो नैतिक विजय तुमचा पराभव मात्र लोकशाहीचा विजय ------------------------ ©भूषण वर्धेकर २२ फेब्रुवारी २०२२ पुणे -------------------------

होकार आणि नकार

होकार आणि नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू मात्र एक पारदर्शी प्रमाणे चकचकीत अभ्युदयाची सुरुवात तर एकात अपारदर्शी दडवणूक एका भ्रमाच्या फुग्याचा स्फोट तत्वाच्या दृष्टीने दोन्ही समर्थ एकीकाकडे निव्वळ आनंदी तर एकीला विलक्षण त्रास एकात अमुलाग्र बदलांची नांदी   तर एकात नैराश्याची भ्रांती उद्वेग, उद्विग्न कुतरोडीची पाठीराखी तर एक उल्हास, उत्साह यांची सोबती सुकाळाची क्रांती, दुष्काळाची संक्रांति एकाच मुद्द्यावर आधारित एकीला सर्वोतोपरी दुरुस्तीला वाव तर एकीचे सोंग मोकाटपणाला चालना देणारे असू द्यावे नसू द्यावे यांचा बेचकीत राहण्याचा संगम एकाच उत्तरात दोन्ही वाटा एकत्र दुकट्या फसव्या भावनांचा पोरखेळ डोळे विस्फारून रक्ताच्या अश्रूत धूर सोडतो तरतरीत चटपटीत काळाच्या शिळा एकमेकांवर आक्रंदत भूत भविष्य अंधारात वर्तमान केवळ स्वप्नवत दुखाची किनार तर कुठे समाधानाचे आगर आयुष्याच्या सोंगट्यांच्या खेळाचा मौल्यवान अविष्कार होकार आणि नकार एका प्रश्नाच्या अलगुज उत्तराचा उर्वरित सारांश भावनांचे अक्षांश, वेदनेचे रेखांश जगण्याच्या प्रवाहात सगळेच सर्वकालिक अशांत संथ - भूषण वर्धेकर २३ जुलै २०१२, ८:१५ रात्री

फुर्रोगामी फियास्को

आज्ञा पाळणारे आज्ञाधारक आदेश पाळणारे गुलाम हुकुम देणारे हुकुमशहा फतवा मानणारे धार्मिक मंगळसूत्र आणि कुंकू स्रीवर लादलेली बंधने स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप हिजाब अन् बुरखा हर चॉईस हलाला आणि मुताह विवाह धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज तीन तलाक धार्मिक अधिकार वटपौर्णिमा किंवा करवा चौथ स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी "संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह "संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका © भूषण वर्धेकर १० फेब्रुवारी २०२२ पुणे

माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली. मग माकडांनी आघाडी घेऊन एक प्रतिनिधी माकड ठरवले सगळ्या प्राणी मात्रांचे प्रश्न मांडण्यासाठी. सगळे प्राणीमात्र भाबडे काहींनी लागलीच मान्यता दिली. काहींना असे समजावण्यात आले की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी काही राखीव सदस्य प्रतिनिधी म्हणून आम्ही ठरवू जे तुमच्या प्राणीवर्गातील सगळे प्रश्न मांडतील. सगळे खुष झाले आम्हाला राखीव जागा मिळणार म्हणून. पण माकड मुळातच हुशार कोणाला निवडायचे हे तेच ठरवणार होते. सिंहाला हे सगळं माहिती होते, दिसत होते. पण त्याला जंगल एकत्र बांधायचे होते. कारभार कर...

गांधीगौरव

अहिंसा फक्त पुस्तकी शोभते, शांतीसाठी युद्ध होते सत्य बोलायला झकास, मात्र सिद्ध करायला नाहक त्रास अस्तेय गुणधर्म म्हणून श्रेष्ठ, पण इतिहासात बळकावणारेच वरिष्ठ ब्रम्हचर्य सामाजिक प्रतिमेचे ध्यान, प्रत्यक्षात भोगवादी कायदेशीर सज्ञान अपरिग्रहात असतात मिरवण्याचे छंद, काबीज करायला संपत्तीचा ताळेबंद श्रमजीवी संघटीत होतात सत्पर, मजबूरीने गुलामगिरीत रमतात तत्पर आस्वाद समर्थ अनुभुतीचे बळ, गरजेपेक्षा जास्त हव्यासाचे मूळ निर्भय होणे प्रगतीचे लक्षण, भीती दाखवणे हे सत्तातुरांचे भक्षण सर्वधर्मसमभाव आदर्शवत प्रमाण, शोषितांचे मात्र धर्मांतर गतिमान अस्पृश्यता निर्मूलन सलोख्याचे अनुष्ठान, सत्तेसाठी मात्र जातीपातीचे अनुमान स्वदेशीची स्विकृती करे राष्ट्र आत्मनिर्भर, सरंजामी घराण्यांचे होई चित्त सैरभैर वर्चस्वासाठी गांधी लागतात, द्वेषासाठी नथुरामाचा पर्याय आसुसलेल्या सत्तेत राहण्यासाठी, दोघेही जिवंत ठेवणं अपरिहार्य ©भूषण वर्धेकर २९ जानेवारी २०२२, रात्री २.१५ AM