होकार आणि नकार

होकार आणि नकार
एकाच नाण्याच्या दोन बाजू
मात्र एक पारदर्शी प्रमाणे
चकचकीत अभ्युदयाची सुरुवात
तर एकात अपारदर्शी दडवणूक
एका भ्रमाच्या फुग्याचा स्फोट
तत्वाच्या दृष्टीने दोन्ही समर्थ
एकीकाकडे निव्वळ आनंदी तर
एकीला विलक्षण त्रास

एकात अमुलाग्र बदलांची नांदी  
तर एकात नैराश्याची भ्रांती
उद्वेग, उद्विग्न कुतरोडीची पाठीराखी
तर एक उल्हास, उत्साह यांची सोबती
सुकाळाची क्रांती, दुष्काळाची संक्रांति
एकाच मुद्द्यावर आधारित

एकीला सर्वोतोपरी दुरुस्तीला
वाव तर एकीचे सोंग
मोकाटपणाला चालना देणारे
असू द्यावे नसू द्यावे
यांचा बेचकीत राहण्याचा संगम

एकाच उत्तरात दोन्ही वाटा एकत्र
दुकट्या फसव्या भावनांचा पोरखेळ
डोळे विस्फारून रक्ताच्या अश्रूत धूर सोडतो
तरतरीत चटपटीत काळाच्या
शिळा एकमेकांवर आक्रंदत
भूत भविष्य अंधारात
वर्तमान केवळ स्वप्नवत
दुखाची किनार तर
कुठे समाधानाचे आगर
आयुष्याच्या सोंगट्यांच्या
खेळाचा मौल्यवान अविष्कार
होकार आणि नकार

एका प्रश्नाच्या अलगुज
उत्तराचा उर्वरित सारांश
भावनांचे अक्षांश, वेदनेचे रेखांश
जगण्याच्या प्रवाहात सगळेच
सर्वकालिक अशांत संथ

- भूषण वर्धेकर
२३ जुलै २०१२, ८:१५ रात्री


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो