फुर्रोगामी फियास्को
आज्ञा पाळणारे आज्ञाधारक
आदेश पाळणारे गुलाम
हुकुम देणारे हुकुमशहा
फतवा मानणारे धार्मिक
मंगळसूत्र आणि कुंकू
स्रीवर लादलेली बंधने
स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं
जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप
हिजाब अन् बुरखा हर चॉईस
हलाला आणि मुताह विवाह
धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज
तीन तलाक धार्मिक अधिकार
वटपौर्णिमा किंवा करवा चौथ
स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड
मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता
म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण
इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी
"संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह
"संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा
सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद
शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद
सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका
फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका
© भूषण वर्धेकर
१० फेब्रुवारी २०२२
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा