दि ग्रेट एडव्हेंचर

 

नथुराम गोडसे आणि औरंगजेब
एकाने एका हिंदूला मारले
दुसऱ्याने अनेक हिंदूंना मारले
नथुरामचे समर्थन करणारे
नेहमीच द्वेषाचे धनी असतात
औरंग्याच्या कबरीवर फुले, चादर चढवणारे
इतिहासाची आब राखणारे असतात म्हणे
थोडक्यात काय,
तुम्ही एकाला मारता की अनेकांना
यावरून इतिहासात खलपुरुष ठरतो
एकाला मारण्याचा इतिहास पारदर्शक असतो
अनेकांना मारल्याचा इतिहास संदिग्ध असतो
कबर, समाधी आणि अस्थी
ज्याची त्याची प्रेरणास्थाने
आजूबाजूला मांडली गेली
अलौकिक वैचारिक दुकाने
दुकाने चालण्यासाठी विक्रेता,
ग्राहक, उत्पादक सदैव सत्पर
सोबत येतातच गुंतवणूकदार,
विपणन शीघ्र सत्वर
प्रत्येकाने नेमलाय एक्स्लुसिव्ह डीलर
विथ एक्सीक्युटिव्ह एरिया मॅनेजर
धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती हे
संविधानाने बांधणे हेच दि ग्रेट एडव्हेंचर
©भूषण वर्धेकर
१९ मे २०२२
पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गडबडलेलं राजकारण

विवेकवादी हतबलता - पूर्वार्ध

उठ भक्ता जागा हो