फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
व्होल्टेअर, मॉन्टेस्क्यू आणि रूसो
देकार्त, कॉम्टे आणि फूको
स्थलांतरितांनी केलाय सगळ्यांचाच फियास्को
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
जगाला घालून दिला लोकशाहीचा पाया
स्थलांतरितांनी करून दाखवला रस्त्यावरचा राडा
जाळपोळ हिंसाचार अन् दिखाऊ क्रांतीचा लढा
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
आधी रेस आणि रिलीजनला
दिलाय कायमस्वरूपी फाटा
नंतर शरणार्थींनी लोकशाहीवर
फिरवलाय झुंडीने वरवंटा
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
लायसिते ते ग्रेट रिप्लेसमेंट थिअरी
अतिडावीकडच्यांना लागते जिव्हारी
ब्लॅकब्लॉक अन् निर्वासितांचा उद्रेक
भूमिपुत्रांच्या नावे फेकाफेक
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
राज्यक्रांतीने केला कधीकाळी राजेशाहीचा अंत
कठोर धर्मनिरपेक्षता आहे आता लोकशाहीची खंत
स्थलांतरितांच्या पिढ्यानपिढ्या झिजल्या इथे
नास्तिकता मात्र मूलनिवासींच्याच माथी
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
हल्लीच उजव्यांचा झालाय श्रीगणेशा
मानवतावाद विरुद्ध देशाची अंतर्गत सुरक्षा
सुप्त लढा सांस्कृतिक की मानवतावाद
वाढतच राहणार कट्टरतेचा प्रमाद
फ्रान्सला आग लागली पळा पळा पळा
©️भूषण वर्धेकर
१९ ऑक्टोबर २०२६
पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा