शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

दयायाचिका आणि माफीनामे

 दया याचिका की माफीनामे 


मर्सी पिटिशन म्हणजे दयायाचिका किंवा दयेचा अर्ज. याची कायद्यात स्पष्ट तरतूद होती. ब्रिटिशकालीन फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (Criminal Procedure Code - 1898) कलम ४०१ आणि ४०२ नुसार. हा दयेचा अर्ज शिक्षा माफ करण्यासाठी, कमी करण्यासाठी किंवा शिक्षेचे स्वरूप बदलण्यासाठी ब्रिटिश शासनाकडे तत्कालीन उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी म्हणजेच व्हाईसरॉय वा गव्हर्नर किंवा थेट ब्रिटिश राजा/राणीकडे केली जाणारी औपचारिक विनंती होती.

अशा पद्धतीची मर्सी पिटिशन ही न्यायालयीन निकालानंतर प्रशासकीय पातळीवर उपलब्ध असणारी पूर्णपणे कायदेशीर व प्रमाणितप्रक्रिया होती, जी सर्व कैद्यांना उपलब्ध असली तरी तिचा अंतिम निर्णय ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या स्वेच्छाधिकारावर अवलंबून होता. अर्थातच ब्रिटिशांनी राजकीय कैद्यांना याचा वापर करण्यास दिलेला असला तरी निर्णय लगेचच घेतला जात नव्हता. 


नेहमी सावरकरांना नावे ठेवली जातात मात्र अशा दया याचिका त्याकाळात बरेच क्रांतिकारकांनी केल्या होत्या. मात्र सावरकरांना शिव्याशाप देऊन बऱ्याच लोकांना आपापली नसलेली अक्कल पाझळायची असते. गुडघ्यात मेंदू असल्यामुळे होत असावे. त्यात मेंदूचा काय दोष डोक्यात भुसकट भरलेले असेल तर मेंदू डोक्यात त कसा राहील?


महत्त्वाचे म्हणजे एखाद्या घटनात्मक पदावरील व्यक्तींवर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यास सरन्यायाधीशांच्या बाबतीत 'न्यायालयाचाअवमान' आणि राष्ट्रपती/राज्यपालांच्या बाबतीत 'विशेष मानहानी खटला' या शस्त्रांचा वापर करून कडक कारवाई केली जाते. अशावेळी खटला दाखल होऊ नये म्हणून माफी मागितली जाते किंवा दिलगिरी व्यक्त जाते. सभ्य भाषेत टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण शिवराळ भाषा वापरल्यास किंवा चारित्र्यहनन केल्यास थेट कायदेशीर कारवाई होते. राष्ट्रपती सरन्यायाधीश आणि राज्यपाल ही संविधानिक पदे आहेत. लोकशाही आहे म्हणून त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलायचे नंतर सारवासारव करत बसायचे असे कसे चालेल?


सीआरपीसी कलम १९९ किंवा आताचे बीएनएसएस कलम २२७ आणि आयपीसी ४९९,५०० कलम किंवा आताचे बीएनएस ३५६ कलमनुसार डिफेमेशन म्हणजे मानहानी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. अशी माहिती गुगल वर सहजपणे उपलब्ध आहे. एआयच्या जमान्यात चॅटजीपीटी जेमिनी ग्रोक डीपसीक क्लाउडे वगैवर विचारले तरी मिळेल. 


सध्या वैचारिक नैराश्य इतके वाढले आहे कित्येकांचे की सावरकरांनी माफीनामे दिले वगैरे बोलले लिहिले की पुरोगामी बाप्तिस्मा दिला जातो. यामुळे अस्सल पुरोगामी विचार बदनाम होतात. ढोंगी, बाजारू आणि धंदेवाईक सुमार पुरोगामी सध्या सर्वत्र पसरलेले आहेत त्यामुळे दयायाचिका आणि माफीनामा किंवा दिलगिरी व्यक्त करणे यावर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखन प्रपंच.


गेली काही वर्षे आपल्या विचारांचा सत्ताधारी नाही हे दुखणे पार खोलवर रूजलेले आहे. या पुढील प्रो मॅक्स लेव्हल म्हणजे ज्या राजकीय पुढाऱ्यांची वेळोवेळी भलामण पाठराखण केली तेच हिंदुत्ववादी कंपूत जाऊ बसले आहेत आपापली स्थानिक मक्तेदारी टिकवण्यासाठी. यातही काही गटतट असे आहेत की सत्तेत कोणीही येवो आम्ही असतोच पाठीराखे सारखे चिरकुट राजकीय संघटना आणि ओढून ताणून सामाजिक चळवळी भासवणारे तत्सम घटक पार बरबटलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनात एखाद्या चौकापुरते आस्तित्व असणारे तर अगतिक झाले आहेत. अशा परिस्थितीत मग सोय होते ती सॉफ्ट टार्गेट निवडून आपापली बौद्धिक भडास बाहेर काढण्यासाठी जवळचे असतात सावरकर टिळक वगैरे नेते. कारण ते ब्राम्हण होते हीच अशा लोकांच्या बुद्धीमत्तेची क्षमता आणि अर्धाछटाक समज! हेच कारण आहे की सावरकरांना पेन्शन. दयायाचिका वगैवर दुषणं देण्यात येतात. लोकमान्य टिळकांना भटमान्य म्हणून हिणवले जाते. एकुण ब्राह्मणांचा द्वेष केला जातो  ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात लढताना. अशी मंडळी राजकारणात वैचारिक दृष्ट्या यशस्वी झाली नाहीत कधीच होणार पण नाहीत . कारण सत्ता असेल तोपर्यंत यांचा सोकॉल्ड पुरोगामी विचार जीवंत असतो सत्ताधारी बदलले की धुळधाण होते अशा लोकांची.  बाकी राजकीय पुरोगामी लोकांची सांस्कृतिक हाराकिरी तर झालीच आहे आताशा समाजिक हाराकिरी होतेय. 


©️भूषण वर्धेकर

१७ ऑक्टोबर २०२६

पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दयायाचिका आणि माफीनामे

  दया याचिका की माफीनामे   मर्सी पिटिशन म्हणजे दयायाचिका किंवा दयेचा अर्ज. याची कायद्यात स्पष्ट तरतूद होती. ब्रिटिशकालीन फौजदारी प्रक्रिया स...