शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

ओ भाऊ…

 ओ भाऊ…


ओ भाऊ…

तुम्ही भूमिका घ्या 

पण अट मात्र एकच 

आम्हाला आवडेल अशीच घ्या!


ओ भाऊ…

तुमचं म्हणणं मांडा

पण अट मात्र एकच 

आम्हाला पटेल असंच मांडा


ओ भाऊ…

तुमचा हक्क सांगा

पण अट मात्र एकच 

आम्ही जे सांगतो त्यावरच मांडा


ओ भाऊ…

तुमचा अधिकार ओरबाडून घ्या 

पण अट मात्र एकच 

आम्ही जे ठरवू तेच तुम्ही ओरबाडा


ओ भाऊ… 

जनहिताच्या मुद्यांसाठी रस्तावर या

पण अट मात्र एकच 

आमचेच मुद्दे तुम्ही उचला


ओ भाऊ…

क्रांती करायला तयार व्हा

पण अट मात्र एकच 

जी आम्ही सांगतो तीच क्रांती करा


ओ भाऊ…

तुमचा विचार मांडा

पण अट मात्र एकच 

आमच्या विचाराशी सुसंगत ठेवा


ओ भाऊ…

पेटून उठून बंड करा

पण अट मात्र एकच 

काडी आमचीच पेटवा


ओ भाऊ..

रक्तरंजित संघर्षात सामील व्हा 

पण अट मात्र एकच 

आम्ही सांगू त्याचात रक्तपात करा


ओ भाऊ…

सामाजिक बदलांना सज्ज व्हा 

पण अट मात्र एकच 

आम्ही सांगतो तोच बदल करा


ओ भाऊ…

ज्वलंत मागण्यांसाठी एकत्र या

पण अट मात्र एकच 

आमच्याच मागण्या पुढे करा


ओ भाऊ…

विषमता संपवायला एकजूट करा 

पण अट मात्र एकच 

आम्ही ठरवू तीच विषमता 


ओ भाऊ…

लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा 

पण अट मात्र एकच 

आम्ही सांगू त्यालाच मतदान करा 


©️भूषण वर्धेकर

११ ऑक्टोबर २०२६

पुणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

व्ह्युवरशिपच्या बैलाला … हो ऽ ऽ ऽ

 व्ह्युवरशिपच्या बैलाला … हो ऽ ऽ ऽ हॅमिश मॅकडोनाल्ड (Hamish McDonald) यांनी लिहिलेल्या  ' द   पॉलिस्टर   प्रिन्स :  द   राइज   ऑफ   धीरू...