ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले
जे जे शोषितांसाठी लढले कामगारांसाठी हाल सोसले लाल बावट्यांनी त्यांना उचलून धरले विळा हातोड्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वंचितांसाठी लढले दुर्लक्षितांसाठी अतोनात झुरले निळ्या पावट्यांनी त्यांना उचलून धरले अशोक चक्रांचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे वर्चस्वासाठी लढले फुटीरवाद्यांना घेऊन एकवटले क्रांती धुरीणांनी त्यांना उचलून धरले विजयी उत्सवाचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे स्वराज्यासाठी लढले गुलामांना धर्माखाली बांधले सत्तातुरांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले सुखवस्तूंनी स्वातंत्र्याचे पताके फडकवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे समाजासाठी लढले ऐहिक कल्याणासाठी टिकले चाणाक्षांनी बेरकीपणे त्यांना उचलून धरले स्वतःच्या विचारांचे मुकुटमणी बनवले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे सर्वांगीण विकासासाठी लढले संधीसाधूंनी त्यांना मिरवले ढोंगी क्रांतीचे बेमालूम प्रणेते बनवले सत्ताधीश बनून सरंजामीत रमले ज्याने त्याने फक्त झेंडेच गाडले जे जे उपेक्षितांसाठी लढले रोजीरोटीसाठी रक्त आटवले समाजसेवेच्या आड धर्मांतरीत गुलाम केले...