रविवार, १७ जानेवारी, २०२१

शूर आम्ही दंगलखोर

शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती

बेरोजगारीच्या खाईत उमगली दगडफेकीची रीत
गल्लीतल्या नेत्याची संगत अन्  जडली येडी प्रीत
करोडोंची नासधूस करून येईल अशी शक्ती संघटीत
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती

तोडफोड वा जाळपोळ करावी हेच आम्हांला ठाव
नियतीच्या लाथाबुक्क्या खाणे हेच आम्हांला ठाव
जातीधर्मापायी सारी इसरू माया ममता नाती
संघटना, जात अन् धर्मापायी हत्यार घेतलं हाती
शूर आम्ही दंगलखोर आम्हाला काय कुणाची भीती
-------------------------------------
विडंबनात्मक
©भूषण वर्धेकर
३ जानेवारी २०१८
रात्रौ ११:१५
हैद्राबाद
-------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे!

आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे! भारतीय राज्यघटना लिहिली जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फार बारकाईने अभ्यास करून आरक्षणाच्या तरतुदी केल्या...