पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलत जाणारे जनमानस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागल्यापासून एकूणच वैचारिक वातावरण खूप बदललेलं आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती असा निकाल लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी सपशेल आपटलेली आहे तर महायुतीला अपेक्षा पेक्षा जास्त सीट्स मिळाल्यामुळे ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. आता मुद्दा असा आहे की एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा भाजपला हार सहन करावी लागली होती  तेव्हा महाराष्ट्रात कोणीही ईव्हीएम चे रडगाणं गायलं नाही. मात्र नंतरच्या चार महिन्यात भाजपालाच पुन्हा भरभरून मतदान झाल्यावर ईव्हीएमचे रडगाणं सुरू झालं विरोधकांकडून. याच्यावर चर्चा होतील वाद होतील. ईव्हीएम कसा हॅक होतं, ईव्हीएमची यंत्रणा कशी कुचकामी, बॅलेट वर घ्यायला काय होतं वगैरे विरोधकांच्या मागण्या आहेतच. मुख्य मुद्दा असा की असं काय नेमकं घडलं गेल्या चार महिन्यात जे इकडचं जनमानस तिकडं झुकलं गेलं यावर कोणीही लक्ष देत नाही. कारण नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ईव्हीएमचं निमित्त मिळाले आहे. महाराष्ट्रात जनतेला बरोबर समजतं कोणाची काय लायकी आहे ते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा वर सगळा राग काढला, विधानसभेत महाविकास आघाडीला झटका दिला...

अस्थिर आशिया कोणाच्या पथ्यावर पडणार?

आशिया खंडातील ४८ देश आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे चार देश म्हणजे भारत चीन रशिया आणि जापान. त्यापैकी जापान देशाबद्दल नंतर चर्चा होईल. पण भारत, रशिया आणि चीन या देशांमधील घडामोडी आशिया खंडातील स्थैर्यासाठी फार महत्वाच्या आहेत. त्यातही मागच्या शतकातील अखेरच्या चार पाच दशकांत रशियाचे विभाजन होणं आशिया खंडातील अस्थिर राजकारणाची फार महत्त्वाची घटना होती. त्यापूर्वी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देताना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान देणं हेही तेवढेच महत्त्वाचे. आशिया खंडातील चार डझन देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास भूगोल बघितला तर कल्पना येईल की गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळात आशिया अस्थिर होणं हे क्रमाक्रमाने वाढत आहे. भारतीय उपखंडातील अस्थिरता अभ्यासाची असेल तर बंगालची फाळणी गेल्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली ते आज एकविसाव्या शतकातील दोन दशकं उलटून गेल्यानंतरही बांग्लादेशात जे होतं ते जगाच्या इतिहासातील फार महत्वाचे पर्व आहे. कारण संपूर्ण जगाचा विचार केला तर पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आशिया खंडातील आहे. तर तीस टक्क्यांच्या आसपास पृथ्वीवरच...

साधना साप्ताहिक लेख प्रतिसाद

साधना साप्ताहिक १३ जूलै २०२४ मराठा आरक्षण: युक्तिवादांचा सुकाळ, तर्काचा दुष्काळ हा प्रतिक कोसके यांचा लेख वाचला. त्या लेखावरचा माझा प्रतिसाद: आरक्षण मिळाल्याने समाजाचा विकास होतो ही एक सामाजिक अंधश्रद्धा आहे. आरक्षण हे साधन आहे संधी न मिळालेल्या वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. पण राजकीयदृष्ट्या वापर करून लोकांनी आरक्षण हेच साध्य बनवलं आहे. कागदोपत्री आकडेवारी दिली की काहीतरी पुराव्यानिशी आपण युक्तिवाद करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात मात्र आकडेवारी देऊन जेव्हा तुलना केली जाते तेव्हा लोकसंख्येच्या प्रमाण ही बाब फार महत्त्वाची. दुसरं तुलनेत कोणकोणत्या घटकांना प्राधान्य दिले आहे याचं. त्यामुळे आकडेवारी देऊन सांगितले की कोर्टात आपली बाजू भक्कमपणे उभी होईल आणि वेळ पडली तर संविधानाच्या चौकटीत राहून तरतूद करण्यासाठी दुरूस्ती विधेयक वगैरे आणण्यासाठी परत आंदोलनं, चर्चा, चिखलफेक हे निर्विवादपणे चालत राहणार आहे. समजा माणसाला आजार झाला असेल आणि त्यावर एखाद्या औषधाची मात्रा लागू होत नसेल तर औषध बदलायला हवं. किंवा आजार होऊ नये म्हणून जीवनशैली बदलणं गरजेची आहे. औषध तेच ठेवायचं आणि डॉक्टर बदलायचे....

लोकसत्ता विशेष लेख प्रतिसाद

ऐसी अक्षरे लेख  https://www.loksatta.com/sampadkiya/features/husain-dalwai-article-about-muslims-need-to-get-adequate-representation-and-opportunities-zws-70-4487601/ हुसेन दलवाई यांचा लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून खालीलप्रमाणे प्रतिसाद लिहिला होता. 'मुस्लिमांना संधी हव्यात आणि प्रतिनिधित्वही...' १८/७/२०२४ रोजीच्या लोकसत्ता मध्ये छापून आलेला विशेष लेख वाचला. लेखात मांडलेले सगळे मुद्दे वाचल्यावर समजतं की लेखकाचा आग्रह प्रतिनिधित्व देणं कसं गरजेचं आहे आणि ते न मिळाल्याने मुस्लिम समाज राजकीय, सामाजिक मागासलेपणा सहन करतोय हे अधोरेखित करतोय. मुळातच महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर समाज सुधारणा होते का? ताजं उदाहरण आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिनिधित्व मराठा समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आघाडीवर आहे. तरीही आरक्षणाची मागणी होते. याचा अर्थ फक्त राजकीय प्रतिनिधित्व किंवा संधी मिळाल्या की समाज सुधारणा होते ही सामाजिक अंधश्रद्धा आहे. मुळातच समाजातील तळागाळापर्यंत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि सेवा का मिळत नाहीत याचा विचार केला पाहिजे. साम...

आरक्षणाच्या बैलाला ऽ ऽ ऽ

त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत आम्हाला करा ब्राह्मण, तरच सोडू आरक्षण एकीकडे प्रत्येकाला पाहिजे होती ब्राह्मण जात आरक्षणाच्या ठेकेदारांना पटत नव्हते अजिबात जातीपातीच्या राजकारणाचे नेते झाले उदास सगळेच झाले ब्राह्मण तर चालणार कसे दुकान वाटलं होतं सुटेल पेच, पुढ्यात होती खरी मेख ब्राह्मणात नक्की कोण, होत्या डझनभर शाखा सगळे ब्राम्हण एकदम, आंदोलनात आले थेट आधी सांगा कोणते ब्राह्मण, मग ठरवा कोटा चित्पावन, देशस्थ, कऱ्हाडे की कायस्थ  सारस्वत चिडले, का आम्हाला वगळता! सर्वात आधी ठरवा, गौड की द्राविडी  लगेचच यजुर्वेदींनी मांडल्या पोटजाती  तेवढ्यात आले देवरुखे, खोत आणि खिस्ती  सोबतीला होते कनौजी, दैवज्ञ आणि कानडी अय्यर सरसावले तोच, नंबुद्रींचा वेगळा नारा कोकणस्थ झाले सावध, देशस्थ उठले भराभरा शेवटी कोटा ठरवण्यासाठी ठरली बैठक उत्तरेतील पंचगौड, की दक्षिणेचे पंचद्रविड नंतर मांडून पोटजाती ठरवा क्रीमी लेअर  शिक्कामोर्तब होऊन कोटा झाला सूकर लिखित पाहिजे म्हणून ठरले एकछत्री सूत्र  तेवढ्यात आला प्...

मोदीस्तोमाची दशकपूर्ती

सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी राजकारणात हळूहळू मोदीकेंद्रीत होऊ लागल्या. याचा फायदा भाजपाला झालाच पण तोटाही भाजपालाच झाला. कारण भाजपाप्रणित मोदी की मोदीप्रणित भाजपा याचे द्वंद्व निर्माण झाले. भाजपाला आजपर्यंत हुकुमी एक्का मिळाला नव्हता सत्तेवर येण्यासाठी. तो मोदींच्या रुपाने मिळाला. कालांतराने मोदींनी आपली पक्षावरची पकड अजून मजबूत केली. राजनाथसिंह यांच्यानंतर अमित शहा यांच्याकडे भाजपाची सूत्रे आल्यानंतर एका वेगळ्या धाटणीचे मॉडेल भाजपाने डेव्हलप केले. साम दाम दंड भेद याचा पुरेपूर वापर पक्षबांधणी आणि सत्ता समीकरणात झाला. राजकीय पक्ष व्यावसायिक पद्धतीने कसा चालवायचा हे मोदी शहा जोडगोळीने दाखवून दिले. याचा परिपाक म्हणजे मोदीकेंद्रीत राजकारण खूप भक्कम झाले. त्यात टिनपाट विरोधकांनीही कोणत्याही समस्येसाठी मोदींच्या नावाने शंख करणे सुरू केले. त्याचा फायदा भाजपा का नाही करणार? यामुळे गेल्या दहा वर्षांत मोदींच्या प्रभावाचा ग्राफ वाढत गेला आणि भाजपाला राष्ट्रीय राजकारणात व्यक्तीकेंद्...

बाबाजी की जय हो

बाबाजी की जय हो| बाबाजी बहोत ज्ञानी थे,  बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे| बाबाजी तो धर्म का प्रचार करते थे, अनुयायी तो संप्रदाय बनाकर उस का प्रसार करते थे| बाबाजी तो सभ्यता और संस्कृति के आग्रही थे, अनुयायी तो रूढ़ि परंपरा लोगों मे थोंपना चाहते थे| बाबाजी सत्य के पथपर चलने का आदर्श रखते थे,  अनुयायी झूठ फैलाकर जुमलेबाजी किया करते थे| बाबाजी के आशीर्वाद के लिये लोक दिवाने थे, अनुयायी लोगो को चुनकर पंथ बनवाने मे लगे हुएँ थे| बाबाजी बहोत ज्ञानी थे,  बस्स उनके अनुयायी बिलकुल हरामी थे| बाबाजी गांधीवादी होकर सत्य, अहिंसा के पुजारी बने थे,  अनुयायी तो नथुरामायण का खेल चलाकर हिंसा को चमकाते थे| बाबाजी तो दिनभर पुजा अर्चा, किर्तन पाठ कर के दिन गुजारते थे,  अनुयायी तो उसी की सिस्टिम बनाकर घर बसाते थे| बाबाजी वसुधैव कुटुंबकम् बोलकर तल्लीन हो जाते थे,  अनुयायी तो बाबाजी को विश्व की सैर करवाते थे| बाबाजी का संवाद हर सजीव, निर्जीव से होता था,  अलग अलग देशो मे बाबाजी की प्रतिमा बढाकर अनुयायी का दुकान चलता था| बाबाजी बहोत ज्ञानी थे,  बस्स उनके अनुयायी बिलकुल हर...

भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती

भुरा - एका संघर्षाची यशस्वी ध्येयपुर्ती शरद बाविस्कर यांच 'भुरा' वर वर पाहता एका खान्देशी तरूणाची संघर्षमय जगण्याची गोष्ट न राहता गेल्या दोन दशकातील तरुणाईची प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केलेली मनस्वी चिंतनशील आणि प्रेरणादायी गोष्ट झाली आहे. लेखनाचा काळ हा लेखकाची दहावी ते जेएनयू मधील शिक्षकी जीवन एवढाच रेखाटला आहे. हा प्रवास सरासरी वीस वर्षातील संघर्ष आणि यशस्वी घोडदौड यापुरता मर्यादित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हाच प्रवास छोटेखानी वाटत असला तरी उर्वरित पुढच्या आयुष्याबद्दल आश्वासक असा वैचारिक पाया यातून साकारला गेला आहे. यात लेखकाने प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने काल सुसंगत घडलेल्या घटना त्यावरची मूलभूत मतं लिहिली आहेत. लिखाण अगदी साधं सरळ सोपं आहे. संघर्ष करताना केलेली वर्णने शब्दबंबाळ होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. बरेचशे प्रसंग लिखाणात आटोपते घेतले आहेत. त्यामुळे लेखक आत्मप्रौढी मिरवतोय असं अजिबात वाटत नाही. कारण आत्मवृत्त वगैरे लिहिताना आत्मप्रौढी कधी लिहिली जाते कळतंच नाही. लेखकाने शिक्षण घेण्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक पद्धतीने वर्णिले आहेत. मोटिव्हेशनल स्प...

ए हान की बडीव

ए हान की बडीव दिसला की अडीव ऐकत कसं न्हाई डोस्क फोडून रडीव लय उडायलाय त्यो उतरव मारुन माज करुन थोबाड काळं ताकद आपली दाखीव हाय आपली सत्ता हुडकून काढू पत्ता टग्यांची फौज आन घुसून घरात हान अडवून एसट्या फोड टायर, पुतळे जाळून युवा नेत्यांची घोडदौड निषेधाची भाषणं झाडून कर उपोषण मंडप टाकून काढ मोर्चा ताफा काढून विस्कटून चौकट गावगाड्याची वेसण बांधून जातीपातीची घाल शिव्या इन कॅमेरा फुगवून छाती वाढीव दरारा गुपचुप निसटुन हो बेपत्ता होऊ दे मेडियात जांगडगुत्ता कर गावबंदी लावून फ्लेक्स सोम्यागोम्यांचे राखून स्टेक्स जेसीबी चालवून बनीव मैदान घेऊन सभा उडीव दाणादाण हो सैरभैर ठिय्या मांडून आदेश घेऊन पडद्यामागून उठीव रान आरोप करून होऊदे बबाल सगळीकडून लपून छपून निरोप धाडून  आण पोती दगडं भरून कर हल्ला धोंडे फेकून पोलिसांचं टकूर फोडून टाकून पेट्रोल बाटली फोड पेटवून टायर चौकात सोड बोलव मेडिया काढ फोटो बघून घेऊ आला तर स्यू मोटो हायती आपलं सायेब खंबीर म्हणलेत घेईल मी सांभाळून विषयच करायचा लय गंभीर  सगळे राह्यले पायजेल टरकून  © भूषण वर्धेकर १० फेब्रुवारी २०२४ पुणे 

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकरमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत. जी मंडळी सावरकरवादी म्हणून खऱ्या अर्थानं सावरकरांचे विचार लिखाण सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून झटत असतात त्यांना खूप मोठ्या नकारात्मक वातावरणात झगडावे लागते. कारण सावरकरविचार हा अनेक स्थित्यंतरे बघून तावून सुलाखून तयार झाला आहे. सावरकरांची कृती हेच त्यांचे विचार पसरवण्याचे साधन होते. तत्कालीन व्यवस्थेचा त्यांना कसलाच पाठिंबा नसल्याने ते एकेरी झुंज देत होते.  सावरकर यांचे विचार त्यांच्या जाणीवेतून आणि सहन केलेल्या अनुभवामुळे कट्टर झाले. सावरकर हे नेहमी रॅशनल पद्धतीने व्यक्त झाले....