पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमचं तुमचं

आमची असते कायदेशीर कारवाई तुमची असते सूडबुद्धीची कारवाई आमची असते संविधानिक दुरुस्ती तुम्ही करता ते संविधानाची तोडमोड  आमचा असतो अस्मितेचा अंगार तुमची असते ती द्वेषपूर्ण नौटंकी  आमची असते लोकशाहीतील एकी तुमची असतात स्पॉन्सर्ड आंदोलने आम्ही मांडतो भूमीपुत्रांचे मुद्दे तुम्ही मांडता सुपारी घेऊन प्रश्न आमचा असतो रस्त्यावरचा लढा तुम्ही करता तो खळखट्याक राडा आम्ही टाकतो नियमानुसार धाडी तुम्ही करता जाणूनबुजून मुस्कटदाबी आम्ही देतो कायदा-सुव्यवस्थेची हमी तुम्ही देता तो गोरगरिबांचा बळी आमचे चालते ते प्रामाणिक प्रशासन तुम्ही करता ते हुकूमशाही शासन आमचा पिंड पारदर्शी व्यवहाराचा तुमचा असतो पाढा भ्रष्टाचाराचा आमच्या विजयात असतो मतदारांचा कल तुमच्या विजयात मात्र ईव्हीएम ची गडबड आमचा पराभव ठरतो नैतिक विजय तुमचा पराभव मात्र लोकशाहीचा विजय ------------------------ ©भूषण वर्धेकर २२ फेब्रुवारी २०२२ पुणे -------------------------

होकार आणि नकार

होकार आणि नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू मात्र एक पारदर्शी प्रमाणे चकचकीत अभ्युदयाची सुरुवात तर एकात अपारदर्शी दडवणूक एका भ्रमाच्या फुग्याचा स्फोट तत्वाच्या दृष्टीने दोन्ही समर्थ एकीकाकडे निव्वळ आनंदी तर एकीला विलक्षण त्रास एकात अमुलाग्र बदलांची नांदी   तर एकात नैराश्याची भ्रांती उद्वेग, उद्विग्न कुतरोडीची पाठीराखी तर एक उल्हास, उत्साह यांची सोबती सुकाळाची क्रांती, दुष्काळाची संक्रांति एकाच मुद्द्यावर आधारित एकीला सर्वोतोपरी दुरुस्तीला वाव तर एकीचे सोंग मोकाटपणाला चालना देणारे असू द्यावे नसू द्यावे यांचा बेचकीत राहण्याचा संगम एकाच उत्तरात दोन्ही वाटा एकत्र दुकट्या फसव्या भावनांचा पोरखेळ डोळे विस्फारून रक्ताच्या अश्रूत धूर सोडतो तरतरीत चटपटीत काळाच्या शिळा एकमेकांवर आक्रंदत भूत भविष्य अंधारात वर्तमान केवळ स्वप्नवत दुखाची किनार तर कुठे समाधानाचे आगर आयुष्याच्या सोंगट्यांच्या खेळाचा मौल्यवान अविष्कार होकार आणि नकार एका प्रश्नाच्या अलगुज उत्तराचा उर्वरित सारांश भावनांचे अक्षांश, वेदनेचे रेखांश जगण्याच्या प्रवाहात सगळेच सर्वकालिक अशांत संथ - भूषण वर्धेकर २३ जुलै २०१२, ८:१५ रात्री

फुर्रोगामी फियास्को

आज्ञा पाळणारे आज्ञाधारक आदेश पाळणारे गुलाम हुकुम देणारे हुकुमशहा फतवा मानणारे धार्मिक मंगळसूत्र आणि कुंकू स्रीवर लादलेली बंधने स्त्रीचं गृहकृतदक्ष राहणं जेन्डर बायस्ड अन् स्टिरिओटाईप हिजाब अन् बुरखा हर चॉईस हलाला आणि मुताह विवाह धार्मिक स्वातंत्र्याचे रितीरिवाज तीन तलाक धार्मिक अधिकार वटपौर्णिमा किंवा करवा चौथ स्रीत्वाच्या गुलामीचं जोखड मासिक धर्मात स्त्रीची अलिप्तता म्हणजे स्त्रीत्वाचे शोषण इद्दाह मात्र धार्मिक पवित्र विधी "संविधान की मनुस्मृती" नारा असतो प्रोग्रेसिव्ह "संविधान की शरिया" नारा कम्युनल प्रोपागंडा सवर्ण दलित फूट म्हणजे हिंदूंचा वर्चस्ववाद शिया सुन्नी वैर असतो इस्लामी अंतर्गत वाद सर्वधर्मसमभावाचा वैचारिक विचका फुर्रोगाम्यांनी केलेला इहवादी पचका © भूषण वर्धेकर १० फेब्रुवारी २०२२ पुणे

माझ्या जंगलगोष्टी

एकदा जंगलात सिंहाने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावून घेतले आणि सांगितले की आपल्याला वाढलेल्या जंगलाचा कारभार पाहण्यासाठी नेमणुका करायच्या आहेत. पण त्या नेमणुका मी राजा असलो तरीही माझ्या मर्जीने करणार नाही. कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे तुमचे मत विचारात घेतल्याशिवाय माझा निर्णय सांगणार नाही. मग प्रत्येक प्राणीवर्ग आपापले प्रतिनिधी कोण याबद्दल चर्चा करू लागले. एका माकडाने शंका उपस्थित केली की कारभार पाहणाऱ्या मंडळीत सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे. सगळ्यांनी त्याची री ओढली. मग माकडांनी आघाडी घेऊन एक प्रतिनिधी माकड ठरवले सगळ्या प्राणी मात्रांचे प्रश्न मांडण्यासाठी. सगळे प्राणीमात्र भाबडे काहींनी लागलीच मान्यता दिली. काहींना असे समजावण्यात आले की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी काही राखीव सदस्य प्रतिनिधी म्हणून आम्ही ठरवू जे तुमच्या प्राणीवर्गातील सगळे प्रश्न मांडतील. सगळे खुष झाले आम्हाला राखीव जागा मिळणार म्हणून. पण माकड मुळातच हुशार कोणाला निवडायचे हे तेच ठरवणार होते. सिंहाला हे सगळं माहिती होते, दिसत होते. पण त्याला जंगल एकत्र बांधायचे होते. कारभार कर...