पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ए हान की बडीव

ए हान की बडीव दिसला की अडीव ऐकत कसं न्हाई डोस्क फोडून रडीव लय उडायलाय त्यो उतरव मारुन माज करुन थोबाड काळं ताकद आपली दाखीव हाय आपली सत्ता हुडकून काढू पत्ता टग्यांची फौज आन घुसून घरात हान अडवून एसट्या फोड टायर, पुतळे जाळून युवा नेत्यांची घोडदौड निषेधाची भाषणं झाडून कर उपोषण मंडप टाकून काढ मोर्चा ताफा काढून विस्कटून चौकट गावगाड्याची वेसण बांधून जातीपातीची घाल शिव्या इन कॅमेरा फुगवून छाती वाढीव दरारा गुपचुप निसटुन हो बेपत्ता होऊ दे मेडियात जांगडगुत्ता कर गावबंदी लावून फ्लेक्स सोम्यागोम्यांचे राखून स्टेक्स जेसीबी चालवून बनीव मैदान घेऊन सभा उडीव दाणादाण हो सैरभैर ठिय्या मांडून आदेश घेऊन पडद्यामागून उठीव रान आरोप करून होऊदे बबाल सगळीकडून लपून छपून निरोप धाडून  आण पोती दगडं भरून कर हल्ला धोंडे फेकून पोलिसांचं टकूर फोडून टाकून पेट्रोल बाटली फोड पेटवून टायर चौकात सोड बोलव मेडिया काढ फोटो बघून घेऊ आला तर स्यू मोटो हायती आपलं सायेब खंबीर म्हणलेत घेईल मी सांभाळून विषयच करायचा लय गंभीर  सगळे राह्यले पायजेल टरकून  © भूषण वर्धेकर १० फेब्रुवारी २०२४ पुणे 

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकरमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत. जी मंडळी सावरकरवादी म्हणून खऱ्या अर्थानं सावरकरांचे विचार लिखाण सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून झटत असतात त्यांना खूप मोठ्या नकारात्मक वातावरणात झगडावे लागते. कारण सावरकरविचार हा अनेक स्थित्यंतरे बघून तावून सुलाखून तयार झाला आहे. सावरकरांची कृती हेच त्यांचे विचार पसरवण्याचे साधन होते. तत्कालीन व्यवस्थेचा त्यांना कसलाच पाठिंबा नसल्याने ते एकेरी झुंज देत होते.  सावरकर यांचे विचार त्यांच्या जाणीवेतून आणि सहन केलेल्या अनुभवामुळे कट्टर झाले. सावरकर हे नेहमी रॅशनल पद्धतीने व्यक्त झाले....

जातीपातीच्या चिखलातील महाराष्ट्र

महाराष्ट्रात सध्या निवडणुकपूर्व आघाड्यांचे मतदारसंघाची वाटणी यावर काथ्याकूट चालू आहे सर्वपक्षीय नेत्यांकडून. जातीपातीच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी चालू आहे. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात जातीची गणितं एवढी खोलवर रुजलेली आहेत की महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या कितीही पुढारला तरी जातीपातीच्या कचाट्यातून सुटणार नाही. विरोधाभास कीती तर, जे पुरोगामी म्हणवून घेणारे जातपात संपली पाहिजे म्हणून आघाडीवर असतात तीच मंडळी यात अग्रेसर आहेत. कधीकाळी भाजपाचे राजकारण हिंदुत्ववादी होते. महाराष्ट्रात ते जातीपातीच्या राजकारणाच्या चिखलात कधी मिसळून एकजिनसी झाले समजलं पण नाही.  प्रत्येक तालुक्यात अमुक तमुक आणि गावागावात फलाना टिमका जातीची किती मतदानाची टक्केवारी आहे याचे डेटाबेसेस रेडी रेकनरप्रमाणे तयार आहेत. उमेदवार सुद्धा त्याच जातकुळीतील दिला की लीड मिळायची खात्री असते. आजवर महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनीच जातपात काहीही न बघता कडवट शिवसैनिक उभा करून मतदारसंघ जिंकून आणला होता. बाकीच्या सगळे सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघाची जातीपातीच्या पॉकेट्स वर निवडणुकीत ड...