मुंबई कुणाची?
मुंबई कुणाची गं बाई कुणाची? लढणाऱ्यांची की लुटणाऱ्यांची? मुंबई कुणाची ? बकाल झोपड्यांची की गगनचुंबी सोसायट्यांची किनाऱ्यावरच्या आगरी कोळ्यांची की शेठ लोकांची फसवलेल्या कामगारांची की धूर्त कारखानदारांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? कष्टकऱ्यांची की लुबाडणाऱ्यांची? मुंबई कुणाची ? गोरगरीब भैय्यांची की खंगलेल्या भूमिपुत्रांची अलिशान बंगल्यांची की जीर्ण झालेल्या चाळींची झगडणाऱ्या कलाकारांची की मुजोर घराण्यांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? विस्थापितांची की प्रस्थापितांची? मुंबई कुणाची ? बुजलेल्या मध्यमवर्गीयांची की फुगीर उच्चभ्रू वर्गांची बरबटलेल्या नाल्यांची की गजबजलेल्या वस्त्यांची विस्तारलेल्या पश्चिमेची की पसरलेल्या पुर्वेची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? व्हेजवाल्यांची की नॉनव्हेजवाल्यांची? मुंबई कुणाची ? गब्बर गुंतवणूकदारांची की लढवय्या संघटनांची कोंडलेल्या घरांची की गुर्फटलेल्या कुटुंबांची विदीर्ण जंगलांची की आत्ममग्न उपनगरांची मुंबई कुणाची गं बाई कुणाची? महत्वकांक्षांची की अपेक्षाभंगांची मुंबई कुणाची ? कीर्द कल्लोळ्ळाची की कोंदट वातावरणाची लब्बाड आश्वासनांची की कर्कश भूलथापांची उपऱ्या लोंढ...