पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी एक एकटा भरकटलेला

मी एक एकटा भरकटलेला एकांतवासात गुदमरलेला झगमगत्या उंच मनोऱ्यात बंदीवासात तरफडलेला भौतिक सुखांसाठी हपापलेला ऐशोआराम टिचभर पोटाला लखलखत्या चंदेरी स्वप्नात जुंपलो...

हा आसमंत माझा

हा आसमंत माझा मी अनन्यसाधारण त्यापुढे उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर गजबजलेल्या तिन्ही दिशा माझ्या पाठी नजर ...

येथे मृत्यूचाही बाजार होतो

येथे मृत्यूचाही बाजार होतो सोबत उथळ विचारांचा बागुलबुवा मेलेल्यांचा जात, धर्म पाहून होतो निषेध विचारसरणीच्या सरणावरती असतो इव्हेंट मानवतेच्या उदरात उजवे डावे वेगळ...

आयुष्याच्या उधळलेल्या

आयुष्याच्या उधळलेल्या आकांक्षा आक्रोशातल्या होरपळलेल्या भावना भावबंधाचे निसटलेले किनारे करूणेचे ढासळलेले मनोरे गाभाडलेल्या ईच्छा अन् मनोकामना निखाऱ्यात विसावल्या संवेदना मर्दुमकीचे फोडलेले अचाट टाहो चिरकाल धुमसत स्मरणात राहो एकांतातले निपचित विचारचक्र गर्द आठवणीत पाणावलेले नेत्र कस्पटासमान रूतलेले आस्तित्व विरहातलं एकलकोंड ममत्व पुसलेल्या पाऊलखुणांच्या वाटा अनाकलनीय गूढ जगरहाटा हुंदक्यामधली सूक्ष्म स्पंदने कर्दमलेली आभासी मने घुसमटीची कर्णकर्कश्य ललकार स्वप्नांतल्या दुनियेची तीक्ष्ण चिरफाड काळोखाच्या अतर्क्य उलाढाली मेटाकुटीचे जगणे नियतीच्या  हवाली --------------------------- -- भूषण वर्धेकर  हडपसर, पुणे रात्रौ ११:०० १७ एप्रिल २०१७ -----------------------------