काश्मिरी पंडितांचे प्रश्न
पुढच्या महिन्यात विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित शिकार चित्रपट प्रदर्शित होतोय. काश्मिरी पंडितांनी ९० च्या दशकात शेवटाला जे भोगलेय त्याचं चित्रण केलेले आहे. अर्थातच बॉलिवूडपट असल्याने लव्हस्टोरी विथ मसाला मुव्ही व्हाया इमोशनल ड्रामा वगैरे असेलच. माझ्या या लिखाणाचा हेतू सिनेमविषयी नसून, काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल आहे. एकूण हिंदुत्ववादी गटाचा आवडता विषय म्हणजेच काश्मिरी पंडितांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा. ज्याच्या जोरावर धर्मीय ध्रुवीकरण हमखास केले जाते. अर्थात तत्कालीन सरकार कॉंग्रेसप्रणीत होते त्यामुळे त्यांचे हे अपयश होते आणि आहे हे मान्य करायलाच हवे. ३७० रद्दबातल केल्यामुळे जो कांगावा केला जातोय आणि ज्यांच्याकडून केला जातोय ती चतुर मंडळी काश्मिरी पंडितांच्या शिरकाणाबद्दल कधीही बोलणार नाहीत. आता तर दोन पंथ मोदीभक्त आणि मोदीद्वेष्टे हे सरसकटपणे सगळ्याच क्षेत्रात झालेत. त्यामुळे सगळीकडेच आनंदीआनंद आहे. मुळ मुद्दा हा आहे जर गुजराती दंगली, बाबरी मस्जिद पतन वगैरे वगैरे घटनांचा पाठपुरावा केला जातो, या घटनांसाठी भाजपाला किंवा एखाद्या तत्कालीन जबाबदार व्यक्तीला जसे टार्गेट केले ज...