क्षमायाचना करण्याजोगे सभ्य अपुले नाते असावे त्यात मनातून खचून उतरलेल्यांना दमडीएवढे स्थान असावे मैत्रीचाहि पिंड वेगळा स्नेहसंबंधाचा धागा निराळा त्यात गुंतणारा भावसोहळा तरी माफी मागावी आम्ही एकदा म्हणून अवतरली प्रस्तूत कविता ! ! ! कधी कधी काही कळेनास होतं. मी तुला जो मध्यंतरी त्रास दिला तो खरच “ खोटा “ म्हणून दिला की “ खरा” म्हणून दिला? असो, तो मुद्दा येथे आज मला संपवायचा आहे.जे आज मी तुला ही इमेल करतोय तीस तू ‘ लवलेटर ‘ म्हणायचे की "दास्ताने-ए-जंग" असे म्हणायचे तूच ठरव. तसे पाहता मी एक खेडवळ भागातून आलेला मुलगा. ना माझ्यापाशी कसली कला न कसली निपुणता. ना मी अभिनय करू शकत, न मी नाच करू शकत , ना गाऊ शकत, ना कोणते वाद्य वाजावू शकत. पण सगळ्या गोष्टी करायची भारी हौस, आवड आहे, होती व असेल यात शंका नाही. कलामंडळात आलो तेव्हा फक्त एकच ध्येय होतं “ नाटक “ बाकी काही नाही. पण इथे फक्त सिनिअर्स बरोबर म्हणतील तोच कायदा? असा पाठ आहे. ते असो कलामंडळाचा विषय निघाला की नुसती वादा-वादी, चर्चा, गटबाजी, रूसवे, फूगवे हेच सर्व गिरवाव लागतं. कारण या सर्व गोष्टी मिळूनच कलामंडळ बनतं.काही गोष्टी सका...