आज मी असे लिहितोय या मागे केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे माझ्या मनातील वेदना मोकळ्या होणे. तसेही ह्या बाबतीत कोणाशीच बोलू शकत नाही. गेले १५ दिवस मला कळत नाही कसली तरी अनामिक ओढ तुझ्याकडे खेचतेय. मी याला प्रेम म्हणून शकत नाही कारण ते दोन्ही बाजूने असेल तरच घडते. एरवी क्रश किंवा एकतर्फी गुंतणे असावे असे वाटते. मला नक्की आठवतेय गेले वर्षेभर मी कधीच तुला पाहून अशा पद्धतीने व्यक्त होत नसे. कारण तेव्हा तुझ्याकडे पाहून मला कसलीच हूर हूर वाटत नव्हती. मात्र जसे मी IPL सामना पाहून आलो आणि त्या नंतर एकूण माझ्या जगण्यात प्रवाहाचे वारे वेगळेच वाहू लागले. म्हणजे अगदी गेल्या १५ दिवसात एकाएकी तुझ्याकडे आकर्षिले गेलोय. एरवी तू फोनवर कोणाशी बोललीस, ऑफिसमध्ये कोणासोबत बोललीस, अगदी मित्रत्वाच्या नात्याने तरी मला काहीच वाटत नसे. मात्र गेले १५ दिवस तुला पहिले की फारच हूर हुर ,धडधड आणि हात पाय कंप पावतात. तुला कोणासोबत बोलताना पाहून फार बेचैन होतोय. कदाचीत खूप खोलवर जाऊन तुझा असा लाईफ पार्टनर म्हणून मी विचार केलाय का? कळत नाही. कारण मला अफेअर वगैरे आवडत नाहीत चिरकाल टिकणारी नाती आवडतात. आणि महत्...