पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी!

एकविसाव्या शतकाची गद्धेपंचवीशी! एकविसाव्या शतकाची अडीच दशकं सरली. गेल्या पंचवीस वर्षात साहित्य, चित्रपट, नाटक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात नेमका काय बदल घडला याचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख. खरंतर राजकीय बाबींवर धांडोळा घ्यायची इच्छा आहे मात्र राजकीय क्षेत्र गेल्या अडीच दशकांत इतकं चिखलाने बरबटलेले आहे की त्यावर कितीही चर्चा करा, कितीही लिहा, कितीही वाद घाला, कितीही रवंथ केले तरी 'परिस्थिती जैसे थे' राहणार आहे. त्यामुळे शक्यतो राजकीय परिप्रेक्ष्यात न पाहता विशेषतः मराठी साहित्य, चित्रपट, नाटक वगैरे या अनुषंगाने लिखाण करायची इच्छा आहे. गेल्या पंचवीस वर्षात मराठी चित्रपट, नाटक आणि साहित्य याविषयी खूप वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विशेषतः समाज माध्यमातून आपली मते ठोकून देणे हे एक राष्ट्रीय आद्य कर्तव्य आहे आणि हे बजावलंच पाहिजे असा सामाजिक प्रवाह सध्या मजबूत झाला आहे.  लेखाची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. २००० नंतरच्या काळात जे काही बदलत गेले ते बघणं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. २००० आधी चित्रपट, नाटक, साह...

विडंबन

विडंबन कुणी ट्रम्प घ्या, कुणी झेलिन्स्की घ्या  या रे पत्रकारांनो, या रे या आंतरराष्ट्रीय हा आनंद घ्या वाढीव बाचाबाचीचा बाईट घ्या  युद्धात फवारतो छुप्या कंड्या, ऑन कॅमेरा बरळतो रे विश्वाचे भाग्य उद्याचे बोलून नासवतो शांतता वाद्यांना फाट्यावर मारुन रे हा इव्हेंट करतो बडबडीचा लाईव्ह कास्ट घ्या  उन्मादाचा दृष्टांत घ्या  चार खंडांचे वैश्विक आत्ममग्न नेते सिंहासनी खाणं कामांचे टेंडर हे डुलत्या महाशक्ती पदी बरळा बोंबला ट्रम्प च्या नावाने ठोठो करूनी युद्धाचा तडका बघा शांततेचा हा फार्स बघा   ©भूषण वर्धेकर  २ मार्च २०२५ पुणे