पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उठ भक्ता जागा हो

उठ भक्ता जागा हो बॉयकॉट चा धागा हो संस्कृतीच्या रक्षणासाठी भावी पिढीच्या कल्याणासाठी  उठ गुलामा पेटून उठ लढण्यासाठी रणशिंग फुंक भक्तमुजोरीला मोडण्यासाठी पुरोगामित्व टिकवण्यासाठी पळ सैनिका जिवानिशी धाव उचल सतरंज्या खाऊन वडापाव आदेशाचे पालन करण्यासाठी  अस्मितेचा अंगार पेटवण्यासाठी खडबडून जागा हो नवसैनिका कर खळखट्याक घे आणाभाका  परप्रांतियांना ठोकण्यासाठी नवनिर्माण जोपासण्यासाठी  लाल कॉमरेडा ठोक सलाम रक्तरंजित संघर्ष कर बेफाम मॅनिफेस्टोच्या संवर्धनासाठी शोषितांच्या मतदानासाठी गर्जून मूलनिवासी घुमू दे नारा वंचितांचा तूच एकमेव सहारा सवर्णांना धडा शिकविण्यासाठी निळ्या क्रांतीच्या उत्थानासाठी आवळून घट्ट मनगट, हे बिग्रेड्या तोडफोड कर बनून घरगड्या सनातन्यांना संपवण्यासाठी  साहेबांना सत्ता गाजवण्यासाठी  हे तरुणा, सार्वभौम देशाच्या कष्टाने मिळवा संधी रोजगाराच्या  टीचभर पोटाच्या उपजिविकेसाठी रक्ताच्या नात्यांच्या भरभराटीसाठी  १९ जूलै २०२३ पुणे