पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय?

भारतातील आंदोलने, चळवळी आणि संप हायजॅक झाली आहेत काय? सरसकटपणे सगळीच आंदोलने ही हायजॅक करण्यासाठीच केली जातात किंवा काही आंदोलने केल्यानंतर हायजॅक होतात. भारतात तर आंदोलने, संप आणि चळवळी वगैरेंचा विचका झालेला आहे. कारण ज्याच्या त्याच्या राजकीय, सामाजिक गरजेनुसार आंदोलने, चळवळी आणि संप वापरले गेले. शोषितांच्या संघटना तर राखीव नेत्यांच्या राखीव प्रश्नांच्या मुखवट्या आडून पडीक नेतृत्व पुनर्वसन करण्यासाठीच वापरल्या गेल्या. एकेकाळी लोकांच्या रोजच्या जगण्यांच्या प्रश्नांना भिडून प्रशासनाला नडून आंदोलने यशस्वीपणे केली जात होती. यात कधीकाळचे अस्सल मातीशी निगडीत कम्युनिस्टांचा दबदबा होता. त्यांच्याकडे एकेकाळी खरीखुरी इहवादी विचारसरणी होती जी सर्व समस्यांवर साधकबाधक चर्चा विमर्श वगैरे करून बौद्धिक झाडून उपाययोजना करीत होती. लढत होती. मात्र भारतातील अस्ताव्यस्त पसरलेल्या भूखंडात कानाकोपऱ्यात रुजली पण फोफावली कधीही नाहीत. कापराप्रमाणे संप्लवन होतेय खरीखुरी कम्युनिस्ट विचारसरणी. भारतातील सर्वात मोठी चळवळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीची. जिच्यातून वेगवेगळ्या संघटना उदयास आल्या. पण  टिकली, टिकवली गे