पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लग्न आणि प्रेम

लग्न आणि प्रेम एकदा लग्न आणि प्रेम यांच्यात कडाक्याचं भांडण झालं लग्न म्हणाले मीच महान प्रेम म्हणाले मीच महान वाद काही संपेना कोणी कोणाला जुमानेना मग त्यांनी ठरवलं त्रयस्थाला विचारावं मान-अपमान समोर दिसले सगळं  ऐकून घेउन मान-अपमान म्हणाले आम्ही दोघे सावत्र भाऊ मान ठेवणारा आणि अपमान करणारा उगाच आमच्यात शत्रुत्व निर्माण करतात प्रेमात अपमान बहुधा होत असतो लग्नात मान ठेवला जात नाही म्हणूम मी तुमच्यात काही बोलणार नाही पुढे दोघांना दुःख दिसले, धडधाकट-सुदृढ दोघांचे ऐकून ते म्हणाले, जगात माझी सारखी मागणी वाढत आहे. प्रेमात दुःख सहन करणारे सापडत नाहीत आणि लग्नात दुःख देणारे भरपूर म्हणून मी काही निर्णय देणार नाही पुढे दोघांना दिसले सुख, निपचित पडलेले कृश आणि अशक्त, कमकुवतपणे म्हणाले माझी जगात फार कमतरता आहे लोकांमध्ये राहण्याची माझी फार ईच्छा असते पण राहता येत नाही आणि प्रेमात मला दिलं जात नाही तर लग्नात नेहमीच ओरबडला जातो म्हणून मी काही निर्णय देत नाही पुढं दोघांना आदर आप्पा दिसले, स्वच्छ टापटीप सगळं ऐकून आप्पा म्हणाले मी असतो जीवनसत्वांसारखा, कमी पडलो तर आजारी करतो आणि

नातं, मैत्री आणि प्रेम

नातं, मैत्री आणि प्रेम एका कंपनीत काम करायचे नातं एकटेच राब राब राबायचं मैत्री कधी निस्वार्थीपणे तर कधी स्वार्थ साधून काम करायचं प्रेमाची तर वेगळीच गोष्ट कधी स्वच्छंदीपणे कधी मुक्तपणे तर कधी कामात लक्ष कधी दुर्लक्ष नात्याला कबाडकष्ट करायची सवयच असते मैत्रीच मात्र वेगळं चालायचं कामाचं स्वरुप पाहून राबायचं नाहीतर मन मारुन काम करायचं प्रेमाचा अजब खेळ साधलं तर सुत नाहीतर मानगुटीवरचं भूत नात्याला ओव्हरटाईमचा भारी शौक मोबदल्याची फिकीर नाही मैत्री मात्र मनासारखं असेल तर झोकून देऊन काम करायचं प्रेमाची गोष्टच न्यारी, लिमीटेड ड्युटी प्यारी स्वतःचे ओव्हरटाईमचे रिकामे रकाने नात्याचीच सारी मक्तेदारी आता मात्र एक सिस्टीम आली, काळ बदलला नातं तसंच राहीलं बुरसटलेलं रांधत मैत्रीने पलटी मारत सगळे हेवेदावे हेरले प्रेम मात्र गुलछबू, आपल्याच धुंदीत कधीतरी फसायचं तर कधी फसवलं जायचं काळानुरुप कंपनीत आधुनिकता आली मैत्री आणि प्रेम पुर्णपणे बदलून गेले कल्लोळाच्या धामधुमीत कलुषित झाले नातं मात्र कृश होत गेलं, खोलवर रुतल्यानं अधिक दृढ झालं मैत्रीचा गोंधळ उडतो प्रेमाची धांदल, त्रेधातिर

प्रेमात आणि युद्धात

प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं असं म्हणतात ...  पण खरतर .... भावनेनं मारायचं असतं अन मनान पुन्हा उभारायचं असतं रडत.. कुढत.. का होईना जगण्याच रहाट चालूच ठेवायचं असतं जगासाठी आनंदी दाखवणं असतं.. स्वत: मात्र एकांतात झुरायचं असतं उगाच  practical  वगैरे जगणं अनुभवायचं असतं एकट्याशीच संवाद साधत राहायचं असतं काय चूक... काय बरोबर... कोणी किती खरं.. किती खोटं याच मोजमाप अविरत चालू ठेवायचं असतं   उगाच स्वतःला दोष द्यायचा असतो पण  मन मात्र तिच्यातालेच दोष टिपत असतं आधुनिक space... Committed...   Liberal...  secure... personal.. वगैरे शेलक्या शब्दांचे जोडे वावगत फिरायचं असतं स्वतःच म्हणणं ठाम असून कोणी विचारात नसतं नाहक सल्ल्यांचा पाऊस सहन करत बसायचं असतं कळत नकळत भूतकाळावर राग येत असतो भविष्याचा विचार करायचा देखावा करत वर्तमान मात्र थंड असतं.. निवांत... जगाच तार्किक वगैरे अनुभवत स्वतःलाच खोदून खोदून पटवायचं असतं न जाणो नवा घडेल काहीतरी असं म्हणत असंख्य दिवस ढकलायचं असतं काही म्हणा प्रेमात पडाव मात्र निभावाण्यासाठीच असं म्हणणारी बरीच मात्र जगणारी मात्र थोड

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...

ऑफिस म्हणजे अजब जंत्री ... सगळेच करतात काम... काही मनापासून तर काही मनाविरूद्ध काही तर आवडीची नोकरी मिळेपर्यंत करायची म्हणून करतात.. काही जणांची पाट्या टाकण्याची जागा काही म्हणा आवडीची नोकरी आणि समजूतदार बायको फक्त स्वप्नातच मिळते प्रत्यक्षात मात्र खेळखंडोबा ... ऑफिसवरून एक आठवलं ... एक आटपाट नगरातलं ऑफिस होतं ... कामगार होते उच्चशिक्षित.. चकाचक इमारती.. प्रसन्न बैठका... मोहक वातावरण एकजण नुकताच जॉईन झाला... फ्रेशर म्हणून.. करायची होती म्हणून करत होता नोकरी... अनुभवासाठी गड्याचं सुरुवातीला बिनसलं सोबतचे होते वयस्क ... मग काय हा तर होतकरू... अनुभवशून्य लोकांचा वाढता कामाचा बोजा याच्यावर...विनाकारण भरपूर शिकून घे म्हणून पडायचा एक मन म्हणायचं सोड नोकरी दुसरं मात्र रडतं-कुढत ... एकदा काय झालं त्याची झाली चूक शिक्षा म्हणून दिलं लो प्रोफाईल जॉब सहा महिने झाले रोज तेच.. ते... तेच... ते कळत नव्हते काय करावे... एकदा मात्र हद्द झाली नोकरी सोडावी म्हणून सनक आली गेला साहेबांकडे पण ते होते मिटींगमध्ये... दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहतो तर काय.. चालू होती कामगारभर्ती.. गर्दीत सुखावणारे

रिकामे साक्षीदार

आपण फक्त रिकामे साक्षीदार जगात चिरकाल फक्त काळ शेवटल्या श्वासाचे दावेदार बाकी उर्वरीत संथ मवाळ गर्क आयुष्यातल्या सुंदोपसंदी अकल्पित वास्तवाच्या गाभ्यात मखमली दूरस्वप्ने मावळती संसारचूलीच्या निवलेल्या राखेत पूर्वापार श्रद्धेची खंगलेली जळमटं सणासुदीच्या उभ्या आडव्या भिंती चौफेर आयुष्याला व्रतवैकल्याची चौकट घुसमटीची बंदिस्त दिखाऊ बांधिलकी मुदतीच्या जगण्यातला एकसूरी पाठ उपजीविकेसाठी दाही दिशा फरपट पोटाच्या भुकेला पर्याय भरमसाठ निर्दयी नियतीचं काळाशी साटंलोटं मृत्यूच्या फेऱ्याला दैवाची बोळवण मातीमोल देहास किरवंताचे संस्कार पाप-पुण्य, गतजन्माची तार्किक उधळण अखेर उरतो एकाकी काळाचा आधार भूषण वर्धेकर 29-10-2015 रात्रौ 10:30 हडपसर